Afzal Khan Tomb : किल्ले प्रतापगड परिसरात छावणीचे स्वरुप, अफजल खानची कबर परिसरात असा पडला पहिला हतोडा, पहा Live Video

Pratapgad : सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान याचा वध केला हाेता. त्यानंतर तेथेच त्याची कबर बांधली होती. या कबरी भाेवती मागील काही वर्षांपासून अतिक्रमण झाले हाेते. ते प्रशासनाने आज पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आले.

Afzal Khan Tomb: After the demolition of Afzal Khan's tomb, the appearance of the camp in Pratapgad area, police arrangement
Afzal Khan Tomb : किल्ले प्रतापगड परिसरात छावणीचे स्वरुप, अफजल खानची कबर परिसरात असा पडला पहिला हतोडा, पहा Live Video   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अफजल खान कबरी भाेवतीचे अतिक्रमण पाडले
  • पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हे बांधकाम हटवण्यात येत आहे.
  • या कारवाईची शिवप्रेमींनी स्वागत केले आहे.

सातारा : शिवप्रताप दिनानिमित्त राज्य सरकाराने गुरुवारी पहाटे 4 वाजेपासूनच किल्ले प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबर परिसरातील अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरवात झाली आहे. या घटनेनेअनुचित प्रकार घडू नये यासाठी 1500 पोलिसांच्या कडक बंदोबस्तात ठेवण्यात आला आहे. प्रतापगड किल्ला परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (Afzal Khan Tomb: After the demolition of Afzal Khan's tomb, the appearance of the camp in Pratapgad area, police arrangement)

अधिक वाचा : Bharat Jodo Yatra भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीचे 'या' नेत्यांसह भारतीय रणजी क्रिकेट संघाच्या महिला खेळाडूही होणार सहभागी

अफजल खानाच्या कबरीच्या सुशोभीकरणावरुन यापूर्वी अनेकदा वाद झाले आहेत. पुर्वी काही चौरस मीटरमध्ये असलेली ही कबर आता काही एकरांत पसरली आहे. यावर अनेक शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी हे बांधकाम हटवावे अशी मागणी केली होती. अनुचित घटना टाळण्यासाठी हा परिसर संपूर्ण परिसर 2006 पासून सील करण्यात आला होता. हा परिसर खुला करावा, अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येत होती. हा वाद न्यायालयातही गेला होता.

अधिक वाचा : तुरुंगातून बाहेर येताच राऊतांची 'जुबा बोले मैत्री'?, दिल्लीत पंतप्रधान, शहांची तर मुंबईत फडणवीसांची घेणार भेट

प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारी अफजलखान वधाची जागा येत्या शिवप्रताप दिनापूर्वी खुली करून अफजलखान कबरीजवळचे जमीनदोस्त करा तसेच अफजलखानाच्या कबरीसमोर अफजल खान वधाचे शिवप्रतापाचे भव्य शिल्प उभा करा या प्रमुख मागण्यांसाठी श्री शिवप्रताप भूमि मुक्ती आंदोलनाच्या वतीने शिवभक्तांची मागणी करण्यात आली होती.

अधिक वाचा : Aaditya Thackeray in Jejuri : आदित्य ठाकरेंनी घेतलं खंडेरायाचं दर्शन

शिवप्रताप भूमिमुक्ती आंदोलनाच्या मागणीनुसार राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफजल खान आणि सय्यद बंडाच्या थडग्याजवळील वनखात्याच्या जमिनीवरील केलेले अनधिकृत बांधकाम पोलीस संरक्षण घेऊन हटवण्याच्या सूचना स्वतः वनमंत्री यांनी सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांना दिल्या होत्या. 30 नोव्हेंबर 2022 पूर्वी अफजल खान वधाची जागा सरकारने जनतेला पाहण्यासाठी खुली केली नाही तर हजारो शिवभक्तांना एकत्रित करून ती जागा शिवभक्त खुली करतील असा इशारा देण्यात आला होता.

याच कारणामुळे कोल्हापूर परिक्षेत्रातील पुणे ग्रामीण, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील सुमारे पंधराशे पोलीस तैनात करण्यात आले होते आणि त्यांच्या बंदोबस्तात आज पहाटे चार वाजल्यानंतर अनधिकृत बांधकाम हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. दरम्यान, आज शिवप्रताप दिन आहे. त्यामुळे आजच्या दिवशी शिवप्रेमी मोठ्या प्रमाणावर प्रतापगडावर जात असतात. मात्र,आज कारवाईमुळे संपूर्ण परिसर बंद ठेवण्यात आला आहे. परिसरात कलम 144 लागू करण्यात आला असून परिसरातील हॉटेलमध्ये असलेले पर्यटकही हटवण्यात आलेले आहेत आणि ती हॉटेल्स बंद करण्यात आली आहेत. पहाटे 4 वाजेपासूनच पोकलेन, जेसीबीच्या मदतीने पाडकामास सुरुवात झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी