Agnipath Protest : अग्निपथची धग महाराष्ट्रातही, योजना रद्द होण्यासाठी बीडमध्ये निदर्शने

Agneepath Scheme Protest : केंद्र सरकारने मंगळवारी लष्करात पुनर्स्थापनेसाठी 'अग्निपथ' योजना जाहीर केली. याला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे.

Agneepath's cloud in Maharashtra too, protests in Beed for cancellation of plan
अग्निपथची धग महाराष्ट्रातही, योजना रद्द होण्यासाठी बीडमध्ये निदर्शने   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अग्निपथवर 13 राज्यांमध्ये हिंसाचार,
  • शेकडो रेल्वे गाड्या रद्द
  • बीडमध्येही अग्निपथ विरोधात निदर्शने करण्यात आली.

बीड : नरेंद्र मोदी सरकारने मंगळवारी सैन्यात पुनर्स्थापनेसाठी 'अग्निपथ' योजना जाहीर केली. याला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम बिहार आणि उत्तर प्रदेशात दिसून येत आहे. या योजनेच्या विरोधात आजही आंदोलने सुरू आहेत. देशभरात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्येही अग्निपथ विरोधात निदर्शने करण्यात आली. (Agneepath's cloud in Maharashtra too, protests in Beed for cancellation of plan)

अधिक वाचा :

विधानपरिषदेसाठी सभापतीनंतर, ठाकूरांच्या भेटीसाठी विरोधीपक्ष नेते अन् संकटमोचकांनी लोकलनं गाठलं विरार

लष्कर भरतीसंदर्भात सरकारने सुरू केलेल्या अग्निपथ योजनेबाबत देशभरात सुरू असलेला विरोध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. त्यामुळे देशातील अनेक ठिकाणी स्थानकांवर आणि गाड्यांवर निदर्शने करण्यात येत आहेत. बिहार, यूपी, तेलंगणासह अनेक ठिकाणी गाड्या जाळण्याच्या घटना घडल्या आहेत. यानंतर रेल्वे सतर्क झाली आहे.पूर्व मध्य रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. अशा परिस्थितीत तुमची ट्रेनही रद्द झाल्या. या आंदोलनाची धग महाराष्ट्रात पोहचली असून अग्निपथ योजना रद्द करण्यात यावी या मागणीसाठी बीड मधील SFI स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया तसेच डेमॉक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहे. 

अधिक वाचा :

पश्चिम रेल्वेवर २० जूनपासून धावणार एसी लोकलच्या ४० फेऱ्या

अग्निपथ योजनेद्वारा ६ महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीसह ४ वर्षाच्या अल्पकालीन अग्निपथ भरती योजना लागु करण्याच्या निर्णयामुळे भारताची सार्वभौमत्व आणी अखंडता धोक्यात आली आहे. तसेच या धोरणामुळे दरवर्षी अंदाजे ३५ हजार तरुण बेरोजगार होतील. ज्यामुळे कालांतराने समाजाचे सैन्यीकरणं होईल त्यामुळे भारताची सार्वभौमत्व आणी अखंडता टिकून ठेवण्यासाठी सरकारने अग्निपथ ही योजना तत्काळ रद्द करावी या मागणीसाठी निदर्शने करण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी