Ajit Pawar visit Vidarbha Marathwada : विधानसभेचे (Legislative Assembly) विरोधी पक्षनेते (Opposition Leader) म्हणून जबाबदारी आल्यापासून अजित पवार (Ajit Pawar) जोरदार कामाला लागले आहेत. पहिल्या दिवसापासून अजित पवार सरकारवर प्रश्नांचा हल्लाबोल करत आहेत. दरम्यान राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे (farmers) मोठे नुकसान झाले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद (Press conference)घेऊन ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. राज्यातील ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे, भागात अजित पवार (Ajit Pawar) हे 28 जुलै म्हणजेच गुरुवारपासून विदर्भ(Vidarbha) , मराठवाड्यासह (Marathwada) राज्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.
अजित पवार हे गुरुवारी, 28 जुलैला गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देतील. शुक्रवारी, 29 जुलैला ते वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देणार आहेत. शनिवारी, 30 जुलैला विरोधी पक्षनेते हे नांदेड, परभणी, हिंगोली व बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देणार आहेत. आपल्या या दौऱ्यात अजित पवार स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेणार आहेत.
Read Also : आज सर्वोच्च न्यायालयात ईडीच्या अधिकाराविषयी सुनावणी
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचं आणि पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून 110 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची तसंच अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधीमंडळाचं अधिवेशन त्वरीत बोलावण्याची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्र लिहून केली आहे.