स्मृतीदिनी NCPला समजाला ठाकरेंच्या हिंदुत्वचा अर्थ; बाळासाहेब ठाकरेंना अजित पवारांनी वाहिली आदरांजली

गावगाडा
भरत जाधव
Updated Nov 17, 2022 | 12:14 IST

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले आहे. त्यानंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनीदेखील ट्विटद्वारे बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.

Ajit Pawar paid tribute to Balasaheb Thackeray
बाळासाहेब ठाकरेंना अजित पवारांनी वाहिली आदरांजली   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अजित पवार यांनी ट्विटद्वारे बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.
  • खासदार संजय राऊत यांनीदेखील एक जुना फोटो शेअर करत बाळासाहेबांना अभिवादन केले आहे.
  • महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेनेचा विचार आणि संघटना टिकली पाहिजे- अजित पवार

मुंबई:  शिवसेना पक्षात (Shiv Sena Party) फूट पडल्यापासून राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. यात बदलत्या राजकारणात शिंदे गट (Shinde group) आणि भाजपाने( BJP) एकत्र आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) आणि शिवसेना एकमेंकांच्या भाव-भावनांमध्ये गुंतून एकमेंकांच्या असणाचा अर्थ सांगत आहेत. कधी-काळी शिवसेनेवर आगपाखड करणाऱ्या राष्ट्रवादीला शिवसेना जवळची वाटत असून बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्त्वचा अर्थ समजू लागला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी ट्विट करत बाळासाहेबांना अभिवादन केलं. (Ajit Pawar paid tribute to Balasaheb Thackeray on tweet) 

अधिक वाचा  : रिक्षा चालकाकडून अश्लील चाळे,घाबरलेल्या मुलीची रिक्षातून उडी

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले आहे. त्यानंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनीदेखील ट्विटद्वारे बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. परंतु अजित पवार यांच्या या ट्विटमधून राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना किती जवळ आली आहे, याची प्रचिती होते.

अजित पवार यांनी ‘शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी जीवनभर लढलेल्या, हिंदुत्वाचा नेमका अर्थ समाजाला सांगणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेबांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेनेचा विचार आणि संघटना टिकली पाहिजे, हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली ठरेल,’असे म्हणत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.

अधिक वाचा  :साप चावल्यानंतर ‘अशी’ होते रक्ताची गुठळी

राष्ट्रवादीने नेहमी शिवसेनेच्या हिंदुत्त्वा विरोध केला, परंतु गेल्या अडीच वर्षात दोन्ही पक्षांचे एकमेंकाविषयी प्रेम वाढलं आहे. याशिवाय आपल्या ट्विटमध्ये त्यांनी शिवसेना पक्षाचा विचार आणि संघटना टिकली  पाहिजे, असंही म्हटलं आहे.  भाजप- शिवसेना युती असताना राष्ट्रवादीला शिवसेनेची विचारधारा कधीच पटली नव्हती. हिंदुत्त्वचं भावना देशाला घातक ठरेल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार बहुतेक वेळा म्हणालेत परंतु अजित पवार यांना आज बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी त्यांच्या हिंदूत्त्वाचा अर्थ समजला आहे. 

दुसरीकडे उद्धव ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांनीदेखील एक जुना फोटो शेअर करत बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. ‘हे नाते खूप जुने आहे. साहेब.. विनम्र अभिवादन’असे संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसोबत बंड केल्यानंतर शिवसेना पक्षात दोन गट पडले आहेत. या बंडानंतर ठाकरे-शिंदे गटांत टोकाचे वाद होत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी हाच वाद टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 16 नोव्हेंबरच्या रात्रीच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केले. मात्र शिंदे यांचा ताफा स्मृतीस्थळावरून निघून जाताच ठाकरे गटातील नेत्यांनी स्मृतीस्थळी गोमूत्र शिंपडले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी