मुंबई : महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांना किरकोळ झटका आला आहे. यानंतर त्यांना ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब्रिजकेंडी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. (Ajit Pawar said that Dhananjay Munde did not have a heart attack)
रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्यासारखे काही नाही. त्यांच्या सर्व तपासण्यात आल्या आहेत. त्यांच्या सर्व तपासण्यात आल्या आहेत. ह्रदयविकाराचा झटका आला नव्हता. कामाच्या ताणामुळे त्यांना भोवळ आली होती. दोन - तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल.