पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देहू येथे संत तुकाराम यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी न देणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. (Ajit Pawar was not given a speech in front of Modi, what exactly happened)
अधिक वाचा :
मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवत होते, समल्यावर उद्धव ठाकरे संतापले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देहू येथे आगमन झाले. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख तसेच इतर भाजप नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत तुकाराम महाराजंच्या गाथेचे दर्शन घेतले. तसेच संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण केले आहे. नरेंद्र मोदी सभास्थळी दाखल होताच त्यांचा तुकोबांची पगडी, उपरणे आणि तुळशीची माळ घालून नितीन महाराज मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिकृती देण्यात आली.
नरेंद्र मोदी यांच्या भाषणाआधी विरोधीपक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सभेला संबोधित केले. करत आहेत. हा सोहळा आपल्यासाठी आनंदाचा आहे. संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी मोदी आले आहेत. त्याचे मी स्वागत करतो. मी मागच्या जन्मात मी काही पुण्याई केली असेल. कारण या मंदिराच्या लोकार्पणासाठी मोदींसोबत मला उपस्थित राहता आले.
त्यानंतर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता थेट पंतप्रधान मोदींना आमंत्रित केले. दरम्यान, ही बाबत मोदींच्या लक्षात आली. त्यांनी अजित पवारांना बोलण्यास जाण्यास खुणावले. पण अजित पवारांनी त्यास नकार देऊन कार्यक्रम नियोजनाप्रमाणे तुम्हीच (मोदींनी) बोलावे असे सांगितले.
त्यानंतर मोदी यांनी संत तुकाराम महाराजांना आदरांजली वाहिली, ते म्हणाले की, संत तुकाराम म्हणत असत की, उच्च-नीच भेद करणे हे सर्वात मोठे पाप आहे. वीर सावरकरही तुरुंगात हातकडी वाजवून संत तुका अभंग म्हणत. संतांनी विविध ठिकाणी भ्रमण करून भारतातील श्रेष्ठ जीवन जिवंत ठेवले आहे. राम मंदिर बांधले जात आहे, काशीचे मंदिरही विकसित होत आहे. विकास आणि वारसा हातात हात घालून चालला पाहिजे.
अधिक वाचा :
पंतप्रधानांसमोर हात जोडताच, अजितदादांच्या खांद्यावर टाकला हात
पीएम मोदी म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी मला पालकी मार्गातील 2 राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरीकरणासाठी पायाभरणी करण्याची संधी मिळाली होती. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग 5 टप्प्यात तर संत तुकाराम पालखी मार्ग 3 टप्प्यात बांधण्यात येणार आहे.