अमरावतीत कार- बाईकची जोरदार धडक; अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू; एक जखमी

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 18, 2022 | 13:29 IST

अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा- बैतूल मार्गावरील निभोंरा फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे.

Amravati Accident
अमरावतीत भीषण अपघात  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
  • बाईक आणि कार यांच्यात झालेल्या जबरदस्त धडकेतून हा भीषण अपघात झाला.
  • या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये बोदड,खरपी, बहिरम ,येथील नागरिकांचा समावेश आहे.

अमरावती: अमरावतीतून (Amravati)  एक मोठी बातमी समोर येतेय. अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा- बैतूल मार्गावरील निभोंरा फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. रात्री उशिरा हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. बाईक आणि कार यांच्यात झालेल्या जबरदस्त धडकेतून हा भीषण अपघात झाला. 

या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये बोदड,खरपी, बहिरम ,येथील नागरिकांचा समावेश आहे. इनोव्हा कार आणि बाईक यांच्यात धडक बसली आणि त्यात हा अपघात झाला. भीषण अपघातामध्ये सहा जण ठार झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर प्रवाशांचे मृतदेह गाडीतच अडकून पडले होते. या अपघातामुळे या मार्गावरची वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती.

अधिक वाचा-  मोठी बातमी: शिव मंदिरात जलाभिषेकादरम्यान चेंगराचेंगरी, दोन महिलांचा मृत्यू

काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या मधून हटवल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली. स्थानिकांच्या मदतीनं पोलिसांनी मदतकार्य राबवलं आहे. या अपघातातील जखमीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

शिरजगाव पोलीस स्टेशन येथील रात्रगस्त अंमलदार हे गस्त करीत असताना त्यांना रोडवरील पुलाजवळ मोटरसायकलचं सीट पडलेली दिसली. त्यानंतर ते तिथे थांबले आणि त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली. पाहणी केली असता त्यांना अपघात झाल्याचं दिसून आलं. अपघात झालेल्या वाहनात जखमी आणि मृत हे अडकून पडले होते. त्यांना वाहनातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे दाखल करण्यात आलं.

नेमका कसा घडला अपघात 

बाईकवरून दोघे जण गावी जाण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी भरधाव इनोव्हा कारनं मागून येऊन बाईकला जोरदार धडक दिली. या धडकेत बाईक चालक पुलावरून थेट खाली फेकला गेला. या तरूणाला जबर मार लागला त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच दरम्यान इनोव्हा कार चालकाचही नियंत्रण सुटलं आणि कारही अपघातग्रस्त झाली. या अपघातात इनोव्हा कारचाही चक्काचूर झाला आहे. 

संजय गजानन गायन हे या घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तर अपघातात पांडुरंग रघुनाथ शनवारे, सतीश सुखदेव शनवारे , सुरेश विठ्ठल निर्मळे, रमेश धुर्वे, प्रतीक दिनेशराव मांडवकर, अक्षय सुभाष देशकर यांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी