Mumbai : ...त्यांचा उद्या आणखी एक घोटाळा बाहेर काढणार, किरीट सोमय्या दादर पोलीस ठाण्यात

Kirit Somaiya : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. दादर पोलीस ठाण्यात शनिवारी भाजपचे नेते किरीट सोमय्या पोहचले. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर यांचा अजून एक घोटाळा उद्या बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला.

Another scam of Pednekar will come out tomorrow: Kirit Somaiya's warning
..त्यांचा उद्या आणखी एक घोटाळा बाहेर काढणार, किरीट सोमय्या दादर पोलीस ठाण्यात   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • SRA घोटाळ्याशी संबंधित प्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ
  • भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दादर पोलीस ठाण्यात दाखल
  • पेडणेकर यांचा आणखी एक घोटाळा उद्या बाहेर काढणार असल्याचा इशारा

मुंबई : एसआरएच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी त्या शुक्रवारी दादर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यानंतर आज भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दादर पोलीस ठाण्यात जावून किशोरी पेडणेकर यांच्या चौकशीची माहिती दिली. (Another scam of Pednekar will come out tomorrow: Kirit Somaiya's warning)

अधिक वाचा : तुझ्यासाठी मी एक सरप्राईज गिफ्ट आणलं आहे म्हणत डोळ्याला बांधली पट्टी आणि...
एसआरए प्रकल्पाच्या घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांना काल दादर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. काल 15 मिनिटे चाललेल्या चौकशीनंतर आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस ठाणे गाठले. तिथे त्यांनी किशोरी पेडणेकर यांच्या चौकशीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

तसेच दादर येथील एसआरए प्रकल्पात किशोरी पेडणेकर यांनी गैरव्यवहार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दादर एसआरए प्रकल्प घोटाळ्यात तीन आरोपी अटकेत आहेत. अटकेत असलेल्या महानगरपालिका वसाहत अधिकाऱ्याशी किशोरी पेडणेकर यांचे व्हॉटसअप चॅट समोर आल्यामुळे पेडणेकर यांचीसुद्धा चौकशी करण्यात येत आहे. दादर एसआरए प्रकल्पात १ कोटी ३५ लाख रुपयांचा घोटाळा झाला असून हे पैसे ८ ते ९ जणांकडून घेण्यात आले आहेत.  यावेळी सोमय्यांनी आणखी एक कागदपत्र बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला आहे. 

अधिक वाचा : TATA Airbus प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले!, नेमकं काय म्हणाले?

एसआरए प्रकल्प घोटाळ्याशी संबंध असल्याचा आरोप फेटाळून लावत पेडणेकर यांनी सांगितले की, एसआरए प्रकल्पाशी माझा काहीही संबंध नाही. दबाव आणून तोंड बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. संजय राऊत यांच्यानंतर मला टार्गेट केले जात आहे. किरीट सोमय्या यांनी आपली बदनामी करण्याचा ठेका घेतल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी