Maharashtra Bhushan Award : याची देही, याची डोळा! लाखो भाविकांच्या उपस्थितीत आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार

Appasaheb Dharmadhikari : ज्येष्ठ निरूपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारकडून दिला जाणारा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Appasaheb Dharmadhikari honored with Maharashtra Bhushan Award
Maharashtra Bhushan Award : याची देही, याची डोळा! लाखो भाविकांच्या उपस्थितीत आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान
  • खारघरमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक आले होते

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारकडून दिला जाणारा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळा आज, रविवारी खारघरमध्ये पार पडला. यावेळी ज्येष्ठ निरूपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर २० लाख श्रीसदस्यांच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. (Appasaheb Dharmadhikari honored with Maharashtra Bhushan Award)

अधिक वाचा : डॉ. अमरसिंह निकम यांना कामाची पावती! जर्मनीतील डॉ. सॅम्युएल हनिमन आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव

या दिमाखदार सोहळ्याच्या महाराष्ट्र सरकारने जय्यत तयारी करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवारीच मुंबईत दाखल झाले होते. पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होण्यासाठी सकाळपासूनच राज्यभरातून अनुयायी खारघरमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे नवीमुंबई परिसरात रेल्वे, बस स्टाॅप परिसरात गर्दी झाली होती. महापालिका, सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस, आरोग्य आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि हजारो श्रीसदस्यांच्या मदतीने १५ दिवसांपासून कार्यक्रमाची तयारी सुरू होती. ३०६ एकरवर जमलेल्या सुमारे २० लाख श्रीसदस्यांवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.

अधिक वाचा : कडबा कुट्टीसह भरलेला ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, शेतकऱ्याचा चिरडून मृत्यू

या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. यासोबतच हा अभूतपूर्व सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी लाखो अनुयायांनी उपस्थिती लावली होती. या पुरस्कारासोबत मिळणारे २५ लाख रुपये आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर करण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी