Apple grant to help protect and restore Raigad mangroves with help from local community : महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील सुमारे २४०० हेक्टरच्या खारफुटीच्या जंगलाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी स्थानिकांना अॅपल कंपनी मदत करणार आहे. पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी अॅपल कंपनीने हा निर्णय घेतला आहे. खारफुटीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी अॅपल कंपनीने अप्लाइड एनव्हॉरमेंटल रिसर्च फाउंडेशन अर्थात एईआरएफला आर्थिक सहाय्य केले आहे. या निधीतून पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन केले जाईल. समुद्राचे पाणी थेट नागरी वस्तीत शिरू नये यासाठी खारफुटीचा बफर झोन विकसित केला जाईल.
अॅपल कंपनीच्या पर्यावरण, धोरण आणि सामाजिक उपक्रम या विभागाच्या उपाध्यक्षा लिसा जॅक्सन यांनी कंपनीच्या उपक्रमांची माहिती दिली. पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी अॅपल कंपनी जगभर वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. पृथ्वीवरचे नागरी जीवन दीर्घ काळ सुरक्षित राहावे याकरिता पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यावश्यक आहे. याच विचारातून कंपनी काम करत असल्याचे लिसा जॅक्सन यांनी सांगितले. कोलंबिया आणि केनियापासून फिलिपिन्स पर्यंतच्या क्षेत्रात अॅपल कंपनी पर्यावरणासाठी काम करत आहे; असे लिसा जॅक्सन म्हणाल्या. आम्ही भारतात खारफुटीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी स्थानिकांच्या सहकार्याने काम करत आहोत, असेही लिसा जॅक्सन यांनी सांगितले. खारफुटीच्या संरक्षण आणि संवर्धनातून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे लिसा जॅक्सन म्हणाल्या.
अॅपल आणि कन्झर्व्हेशन इंटरनॅशनल सोबत काम करण्याच्या निमित्ताने एईआरएफला खारफुटीच्या संरक्षण आणि संवर्धनाची सुवर्णसंधी लाभली आहे, असे एईआरएफच्या संचालिका अर्चना गोडबोले यांनी सांगितले. प्रत्येक ठिकाणच्या परिस्थितीनुसार खारफुटीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वेगवेगळे धोरण राबवावे लागेल. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आम्ही अॅपल आणि कन्झर्व्हेशन इंटरनॅशनल सोबत हे आव्हान स्वीकारले आहे; असे अर्चना गोडबोले म्हणाल्या.
एईआरएफ कोलंबियातील उपक्रमातून मिळालेल्या अनुभवांचा उपयोग महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यात करणार आहे. या प्रयत्नांतून खारफुटीच्या संरक्षण आणि संवर्धनाचे एक राष्ट्रीय मॉडेल विकसित करणार असल्याचे अर्चना गोडबोले यांनी सांगितले. अॅपल कंपनीने २०३० पर्यंत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जी आव्हाने स्वतःसमोर ठेवून काम सुरू केले आहे त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यात खारफुटीचे संरक्षण आणि संवर्धन केले जाणार असल्याचे अर्चना गोडबोले यांनी सांगितले.