धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरुन एक स्कॉर्पिओ जात असताना पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गाडी थांबवली. पोलिसांनी गाडीच्या आत डोकावले तेव्हा ते पाहून पोलिसांची तारांबळ उडाली. कारमध्ये शस्त्रांचा साठा सापडला. आज सकाळी सोनगीर पोलिसांनी कार थांबवून झााडझडतीमध्ये पोलिसांना गाडीच्या आत ८९ तलवारी व एक खंजीर सापडला. (As soon as the door of a Scorpio was opened on the Mumbai-Agra highway, the police lost consciousness)
अधिक वाचा :
पोलीस अधिकारी प्रवीणकुमार पाटील यांनी ही माहिती दिली. धुळ्यातील सोनगीर गावाजवळ पोलिसांनी एका वाहनातून तलवारीचा मोठा साठा जप्त केला असून त्यासह चार जणांना अटक केली आहे. वाहनासह 7,13,600 रुपये किमतीच्या 89 तलवारी आणि 1 खंजीर जप्त करण्यात आला आहे.
स्कॉर्पिओमध्ये एवढ्या प्रमाणात शस्त्रसाठा पाहून पोलीस चक्रावून गेले. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींची चौकशी सुरू आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ही शस्त्रे चित्तोडगड येथून नेण्यात आली असून ती जालना येथे नेली जात होती. तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकारी प्रवीणकुमार पाटील यांनी सांगितले. ही हत्यार कशासाठी घेऊन जात होते, याचा शोध पोलिस घेत आहेत. हे लोक नंतर त्यांचे काय करणार होते आणि इतर आरोपीही यात सामील आहेत. या सर्व बाबी तपासण्यात येत आहेत.