पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याला सुरुवात झाली असून सायंकाळी तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींची पालखी पंढरीकडे प्रस्थान होत आहे. या माऊलींच्या आषाढी पायीवारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तामीळनाडूमधील लाखो भाविक दाखल झाले आहेत. टाळ - मृदंगाच्या निनादात 'ज्ञानोबा माउलींच्या' गजरामुळे अवघी आळंदीनगरीचे वातावरण विठ्ठलमय झाले आहे.
अधिक वाचा : SATARA | यंदाच्या आषाढीची पूजा फडणवीस करतील :- आ.जयकुमार गोरे
कोरोनामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी पायीवारीचे आज पंढरपूरकडे होणार आहे. सोहळ्यासाठी आळंदी नगरी सज्ज झाली आहे. आज ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार असल्याने इंद्रायणी काठ वारकऱ्यांनी गजबजला आहे. आज सायंकाळी माउलींच्या पालखीचे देऊळवाड्यातून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होत आहे. आळंदीत लाखो भाविक सहभागी झाले आहेत.
कालच देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे. संतश्रेष्ठ तुकाराम ढोक महाराज यांच्या पालखीचे पिंपरी चिंचवड शहर ग्राम मध्ये भक्ती-शक्ती चौकात भव्य स्वागत करण्यात आले यावेळी खूप मोठ्या प्रमाण प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली होती. दोन वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पिंपरी-चिंचवडकर यांना संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शनाला आले .यावेळी शहरवासीयांच्या चेहर्यावरील आनंद ओसंडून वाहत होता यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील होता.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे उद्या (बुधवारी) पुण्यात आगमन होणार असून, वारकऱ्यांच्या स्वागत व सेवेसाठी पुणे महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. गुरुवारीही पालख्यांचा मुक्काम शहरातच असेल.
आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी Posted by Times Now Marathi on Tuesday, June 21, 2022