Ashtavinayak Helicopter Service : हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शन

Ashtavinayak Darshan Helicopter Service : एरवी तीन दिवसांत पूर्ण होणारी अष्टविनायक यात्रा हेलिकॉप्टरद्वारे अवघ्या सात तासांत करणे शक्य आहे. गणेशभक्तांसाठी अष्टविनायक यात्रा हेलिकॉप्टर सेवा सुरू झाली आहे.

Ashtavinayak Darshan Helicopter Service
हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शन
  • गणेशभक्तांसाठी अष्टविनायक यात्रा हेलिकॉप्टर सेवा सुरू
  • तीन दिवसांत पूर्ण होणारी अष्टविनायक यात्रा हेलिकॉप्टरद्वारे अवघ्या सात तासांत करणे शक्य

Ashtavinayak Darshan Helicopter Service : एरवी तीन दिवसांत पूर्ण होणारी अष्टविनायक यात्रा हेलिकॉप्टरद्वारे अवघ्या सात तासांत करणे शक्य आहे. गणेशभक्तांसाठी अष्टविनायक यात्रा हेलिकॉप्टर सेवा सुरू झाली आहे. यामुळे अष्टविनायक यात्रेसाठी येणाऱ्या भक्तांची मोठी सोय झाली आहे. विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि अष्टविनायक देवस्थान न्यास मंडळ यांनी अष्टविनायक दर्शन यात्रा हेलिकॉप्टर सेवा सुरू केली आहे. या सेवेसाठी वरद एव्हिएशन कंपनी हेलिकॉप्टर सेवा देत आहे. 

महाराष्ट्र शासनाने जुन्नर हे पर्यटन स्थळ जाहीर केल्यानंतर जुन्नरमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. यानंतर महाराष्ट्रात अष्टविनायक दर्शन यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू झाली आहे. या सेवेसाठी सध्या सुमारे लाखभर रुपये मोजावे लागणार आहेत. 

ओझर येथून अष्टविनायक यात्रा हेलिकॉप्टरद्वारे सुरू होईल. रांजणगाव, सिद्धटेक, मोरगाव, थेऊर, पाली, महड, लेण्याद्री ही अष्टविनायक यात्रा हेलिकॉप्टरद्वारे पूर्ण केली जाईल. हेलिकॉप्टरसाठी प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हेलिपॅडची निर्मिती करण्यात आली आहे. देवस्थान ट्रस्ट कडून हेलिपॅड ते मंदिर अशी वाहन व्यवस्था आहे. एका हेलिकॉप्टरमध्ये सहा जणांची आसनक्षमता आहे. भाविकांची यात्रेपूर्वी आरोग्य तपासणी केली जाईल. कोरोना संकटाचे भान ठेवून कोविड प्रोटोकॉलचे पालन करत हेलिकॉप्टर यात्रा करता येणार आहे.

अष्टविनायक यात्रा हेलिकॉप्टर सेवेची माहिती https://www.facebook.com/VaradAviation/ या फेसबुक पेजवर तसेच https://www.facebook.com/VaradAviation/about या लिंकवर उपलब्ध आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी