फॅशन डिझायनर बनला दुचाकी चोर, OLXच्या माध्यमातून विकल्या चार बाईक

डोंबिवली येथील पलावा सिटीत राहणारा एखा फॅशन डिझाईनरने लॉकडाऊनमध्ये त्याला काम नसल्याने तो बेरोजगार होता.पैशांसाठी त्याने बाईक चोरी करण्याचे ठरवत  चार बाईक चोरल्या. चारही बाईकचे खोटे कागदपत्रे तयार करुन ओएलएक्सच्या माध्यमातून त्या बाईक विकल्या.

Became a fashion designer bike thief, four bikes sold through OLX
फॅशन डिझायनर बनला दुचाकी चोर, ओएलएक्सच्या माध्यमातून विकल्या चार बाईक   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • फॅशन डिझाईनरने बेरोजगारीमुळे बाईकची चोरी केली.
  • चारही बाईकचे खोटे कागदपत्रे तयार करुन ओएलएक्सच्या माध्यमातून त्या विकल्या.
  • मानपाडा पोलिसांनी या चोरटय़ाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मुंबई : लॉकडाऊनमुळे काही काम न राहिल्याने एक फॅशन डिझाईनर बाईक चोर बनला असल्याचे डोंबिवलीत उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे यूसूफ खान या फॅशन डिझाईनरने चोरीच्या चार बाईक ओएलएक्सच्या माध्यमातून बनावटी कागदपत्रच्या आधारे आरटीओला फसवत विकल्या. बाईकचे चलन कापल्याने त्याचा मेसेज आल्याने संबंधित व्यक्तीने पोलीस स्थानकात तक्रार दिल्यानंतर मानपाडा पोलिसांनी या चोरटय़ाच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Became a fashion designer bike thief, four bikes sold through OLX)

डोंबिवलीत बाईक चोरीचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले आहे. या चोरट्याना गजाआड करण्यासाठी डीसीपी संजय गुंजाळ एसीपी जे डी मोरे यांनी चोरटय़ांच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक बाईक चोरीचा तपास करीत होते. याच दरम्यान एक चोरी गेलेल्या बाईकचे चलान कापल्याने त्याचा मेसेज ज्या व्यक्तिची बाईक चोरी गेली होती त्याच्या मोबाईलवर गेला. त्या व्यक्तीने याची माहिती मानपाडा पोलिसांना दिली.

मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी सुनिल तारमळे यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. सदर बाईक ही पुण्याचा एक व्यक्ती वापरत होता. पोलिसांच्या पथकाने पुणे गाठत या व्यक्तीकडे चौकशी केली असता  त्याने सांगितले रितसर कागदपत्रे तयार करुन ही बाईक विकत घेतली आहे. ओएलएक्सच्या माध्यमातून हा व्यवहार झाला असल्याचे सांगितले .सदर बाईक समीर शेख नावाच्या व्यक्तीने बाईक विकल्याचे उघड झाले. मात्र समीर शेख नावाची व्यक्ती अस्तित्वात नसल्याचे पोलिस तपासात उघडझाले.

पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत सापळा रचत अखेर यूसूफ खानला अटक केली.यूसूफ खान हा डोंबिवली येथील पलावा सिटीत राहणारा युसूफ खान हा फॅनश डिझाईनर होता.  लॉकडाऊनमध्ये त्याला काम नसल्याने तो बेरोजगार होता.पैशांसाठी त्याने बाईक चोरी करण्याचे ठरवत  चार बाईक चोरल्या. चारही बाईकचे खोटे कागदपत्रे तयार करुन ओएलएक्सच्या माध्यमातून चारही बाईक विकल्या.

यूसूफ खान याने बाईक विकत घेणाऱ्याचा नाही तर  बनावटी कामगपत्र बनवत त्या गाड्या आरटीओ  मध्ये पासींग करून आरटीओचीही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. सध्या  यूसूफ खानला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.  अजून किती बाईकची चोरी केले आहे याचा  तपास मानपाडा पोलिस करीत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी