Beed : नवरात्रौत्सवात 10 जणांना विषबाधा, काहींची प्रकृती चिंताजनक

Beed poisoning : नवरात्रौत्सवादरम्यान उपवासाठी फराळ म्हणून खालेल्या भगरीमुळे सुमारे 10 जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात समोर आला आहे.

Beed : नवरात्रौत्सवात 10 जणांना विषबाधा, काहींची प्रकृती चिंताजनक
Beed: 10 people poisoned during Navratri festival, some in critical condition  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • बीडमध्ये दहा जणांना विष बाधा
  • भगर खालल्याने उलट्या, मळमळीचा त्रास
  • खासगी रुग्णालयात आणि ग्रामीण रुग्णालयात उपचार

बीड : गेवराई तालुक्यातील गूळज गावात काल रात्री घटस्थापनेचा कार्यक्रम पार पडला होता. नवरात्रौत्सवात गावातील लोकांनी उपवासात फराळ म्हणून भगर खालल्याने 10 जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ( Beed: 10 people poisoned during Navratri festival, some in critical condition)

अधिक वाचा : संजय राऊतांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला

बाधित रुग्णांना गेवराईच्या आधार रूग्णलयात आणि  काहींवर उपजिल्हा रुग्णालयात  तातडीच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर काही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तर काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. यामध्ये सहा ते सात महिलांचा समावेश आहे. 

गूळज या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी काल (दि २६ रोजी) घटस्थापनेमुळे दिवसभर या लोकांना उपवास होता. तसेच रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान लोकांनी फराळ म्हणून भगर खाल्ली होती. त्यातूनच त्यांना मळमळ, उलटी, हातपाय थरथर कापणे, असे लक्षणे आढळून आल्याने विलंब न करता उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले, असल्याची माहिती डॉ.बी.आर मोटे यांनी दिली आहे. दरम्यान हे दहा लोक वेगवेगळ्या कुटुंबियात असून महिलाआणि पुरूष यांचा या दहा जणांमध्ये समावेश आहे.

याच पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन विभाग ॲक्शन मोडवर आला असून मोंढा परिसरातील दोन दुकानांवर छापे टाकून अधिकाऱ्यांनी भगरीचे पोते सील केले आहेत. सध्या भगरीचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आलेत. त्यानंतर या दुकानावर कारवाईचा इशारा अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्याने दिला आहे.

डाॅक्टरांचे म्हणणे आहे की अन्न विषबाधा हा अन्नपदार्थ जनित आजार आहे. हा संसर्ग पसरवणारे विषाणू, जीवाणू किंवा परजीवी यांच्यामुळे दूषित झालेल्या अन्नातून होत असतो. अन्न विषबाधा गंभीर नसेल तर घरगुती उपायांनीही बरे होतात. पण काही प्रसंगी दवाखान्यात जाणे क्रमप्राप्त होते. अन्न विषबाधा झाल्यावर लोक खायला घाबरतात. पण काही असे अन्नपदार्थ आहेत जे अशी विषबाधा झाली तरी आपण खाऊ शकतो. त्याने पोटाला आराम मिळतो आणि विषारी पदार्थ बाहेर पडायला मदत होते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी