बीडच्या बाजार समितीच्या निवडणुकीवरून क्षीरसागर काका-पुतणे आमने-सामने

Beed News: ही निवडणूक कुणाला खिंडीत पकडण्यासाठी नाही. तर गेली चाळीस वर्षांपासून एकहाती असलेली सत्ता पाडण्यासाठी, आम्ही मार्केट कमिटी निवडणूक जिंकण्यासाठी एकत्र आलो आहोत.

Beed Bazar Samiti election Kshirsagar uncle and nephew verbal clash read details in marathi
बीडच्या बाजार समितीच्या निवडणुकीवरून क्षीरसागर काका-पुतणे आमने-सामने 
थोडं पण कामाचं
  • 'एकाच कुटुंबातील शंभर लोकांची नावे मतदार यादीत'
  • आमदार संदीप क्षीरसागर यांचा काका जयदत्त यांचं नाव न घेता गंभीर आरोप

सुकेशनी नाईकवाडे, बीड

Beed News: बाजार समितीच्या निवडणुकीवरून बीडमध्ये चांगलंच वातावरण तापलं आहे. निवडणुकीच्या मतदार यादीवरून पुन्हा एकदा क्षीरसागर काका पुतणे आमने सामने येण्याची शक्यता असून पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागरांवर गंभीर आरोप केले आहेत.

व्यापारी मतदारांचे नावं वगळून घरातील आणि एकाच कुटुंबातील जवळपास 100 लोकांची नावे लावण्यात आले आहेत. जालन्याच्या लोकांची नावे इथं लावली आहेत असा गंभीर आरोप पुतणे संदीप क्षीरसागर यांनी नाव न घेता जयदत्त क्षीरसागरांवर केला आहे. त्याचबरोबर या सर्वांना नेमकं लायसन्स कोणी दिलं? हा माझं प्रश्न आहे. हे सर्वजण घाबरले असून ही निवडणूक आम्ही जिंकून झेंडा लावणारचं असा निश्चय संदीप क्षीरसागर यांनी केलाय. संदीप क्षीरसागर सर्वपक्षीय आयोजित केलेल्या शेतकरी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे पण वाचा : काखेतला काळेपणा दूर करण्यासाठी रामबाण उपाय

यावेळी ठाकरे गट शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप, राष्ट्रवादी जिल्हाप्रमुख राजेश्वर चव्हाण, वंचित बहुजन आघाडी मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांच्यासह काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, शेतकरी अनुदान संघर्ष समिती, शेतकरी सुकाणू समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

हे पण वाचा : अरेंज मॅरेज करण्यापूर्वी हे 7 प्रश्न नक्की विचारा

यावेळी संदीप क्षीरसागर म्हणाले की, ही निवडणूक कुणाला खिंडीत पकडण्यासाठी नाही. तर गेली चाळीस वर्षांपासून एकहाती असलेली सत्ता पाडण्यासाठी, आम्ही मार्केट कमिटी निवडणूक जिंकण्यासाठी एकत्र आलो आहोत. आमच्या सोबत हमाल मापाडी देखील आहेत असंही यावेळी संदीप क्षीरसागर म्हणाले.

हे पण वाचा : चेरी टोमॅटो, टेस्टच नाही आरोग्यासाठीही आहे एकदम बेस्ट

बीड बाजार समितीच्या मतदार यादीत हमाल मापाडी आणि व्यापारी यांचे नाव असतात. ही काही ग्रामपंचायत निवडणुकीची मतदार यादी नसते, मात्र या बाजार समितीच्या मतदार यादीत जर तुम्ही पाहिलं, तर व्यापाऱ्यांच्या यादीतील व्यापाऱ्यांचे नाव उडवले आहेत. सर्वात महत्त्वाचं घरच्या लोकांचे नाव या मतदार यादीत लावले आहेत. याचाच अर्थ विरोधक घाबरले आहेत. यामुळे विश्वासाने आम्ही ही निवडणूक जिंकणारच आहोत. त्यामुळे निश्चितपणे बीड मार्केट कमिटीवर आपण झेंडाचं लावणार, असं टीकास्त्र सोडत झेंडा लावण्याचा निश्चय देखील यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी