सुकेशनी नाईकवाडे, बीड
Sandeep Kshirsagar : बीडचा राजकारणातील मातब्बर क्षीरसागर कुटुंबात पुन्हा एकदा बाप लेकाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वडिलांनी मुलाने धक्काबुक्की केल्याची तक्रार बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दिली आहे.
आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे बंधू अर्जुन क्षीरसागर यांनी आपल्या पित्यालाच धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आमदार संदीप क्षीरसागर आणि अर्जून क्षीरसागर यांच्यावर अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिता-पुत्रात हा वाद नेमके कोणत्या कारणावरून झाला अद्याप समोर आले नाही. मात्र या वादाची राजकीय वर्तुळात चर्चां होत मात्र चांगलीच रंगली आहे.
हे पण वाचा : तेल लावल्यानंतरही केस का गळतात? वाचा कारणे आणि उपाय
वडिलांनी केलेल्या आरोपांनंतर आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक कारणावरुन आमदार संदीप क्षीरसागर आणि अर्जुन क्षीरसागर यांनी वजील रवींद्र क्षीरसागर यांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. रवींद्र क्षीरसागर यांच्या आरोपांनंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
हे पण वाचा : या सवयींमुळे ऐन तारुण्यात येतो हार्ट अटॅक, तुम्हाला आहेत का या सवयी?
राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर, आपल्या वडिलांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली, बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय. याविषयी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर म्हणाले, की काल रवींद्र क्षीरसागर यांनी आपल्या दोन मुलांविरुद्ध तक्रार केली होती. मला माझ्या दोन मुलांनी धक्काबुक्की करून शिवीगाळ केलीय. त्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्यात आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे बंधू अर्जुन क्षीरसागर यांचे नाव असून पुढील तपास सुरू आहे.