Beed Rape Case : बीड जिल्ह्यातील गेवराईत नात्याला काळिमा फासणारी घटना, 2 दिरांकडून भावजयीवर अत्याचार

गावगाडा
Updated Feb 06, 2023 | 21:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

two close relatives arrested for rape a woman in beed district gevrai : बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातील एका विवाहित महिलेवर तिच्या दोन दिरांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed Rape Case, two close relatives arrested for rape a woman in beed district gevrai
बीड जिल्ह्यातील गेवराईत नात्याला काळिमा फासणारी घटना  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बीड जिल्ह्यातील गेवराईत नात्याला काळिमा फासणारी घटना
  • 2 दिरांकडून भावजयीवर अत्याचार
  • दोघांना अटक, पोलीस तपास सुरू

two close relatives arrested for rape a woman in beed district gevrai : बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातील एका विवाहित महिलेवर तिच्या दोन दिरांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात बादशाह महेबूब सय्यद (28) आणि फैज शेरू शेख (25) या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

पाच-सहा महिन्यांपासून सुरू होते अत्याचार

पती बाहेरगावी असताना साधारण पाच-सहा महिन्यांपूर्वी बादशाह एकदा घरी आला. त्याने मोबाइलमधले मी आंघोळ करत असतानाचे फोटो आणि व्हिडीओ दाखवले. माझ्याशी संबंध ठेवले नाही तर हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर टाकेन अशा प्रकारची धमकी त्याने दिली. हा प्रकार मी सासऱ्यांना सांगितला तर त्यांनी मुलावर विश्वास आहे असे सांगितले. नंतर दिराने एकदा मला एकटीला बघून माझ्यावर बळजबरी केली. नंतर त्याने मावस भाऊ फैजला घरी आणले. फैजनेही बळजबरी केली; असे पीडितेने पोलिसांना फिर्याद देताना सांगितले. 

स्नायू बळकट करण्यासाठी करायचे 5 व्यायाम

सचिनची मुलगी सारा तेंडुलकर सध्या काय करतेय?

पोलीस तपास सुरू

पीडितेने दिलेल्या माहितीआधारे पोलिसांनी फिर्याद नोंदवली आहे. फिर्यादीआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून बादशाह महेबूब सय्यद (28) आणि फैज शेरू शेख (25) या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी