Mumbai BEST Service:आता बेस्ट बसचा प्रवास आणखीन सुखकर, तिकीट खरेदी प्रक्रियेत मोठा बदल

गावगाडा
Pooja Vichare
Updated Aug 08, 2022 | 09:18 IST

Mumbai BEST Digitalization: बेस्टनं मोबाइल ॲपआधारित टॅक्सीप्रमाणे बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये तुम्ही ऑनलाईन तिकीट (online Ticket) काढून आपलं आसन आधीच आरक्षित करू शकणार आहात.

Best Bus
बेस्ट बस 
थोडं पण कामाचं
  • बेस्ट बस (BEST BUS) दिवसेंदिवस डिजिटलायझेशनच्या दिशेनं वाटचाल करत आहे.
  • तुम्ही ऑनलाईन तिकीट (online Ticket) काढून आपलं आसन आधीच आरक्षित करू शकणार आहात.
  • बेस्टनं रविवारी आपला स्थापना दिन साजरा केला. यानिमित्तानं ही सेवा सुरू करण्याचा निर्णय बेस्टनं घेतला.

मुंबई: Best Bus: सध्याच्या दिवसात मुंबईतील (Mumbai)बेस्ट बस सामान्य नागरिकांना परवडणारी आहे. दररोज कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना सकाळी आणि संध्याकाळी घरी परत जाताना काळी- पिवळी टॅक्सी परवडत नाही. तसंच गर्दीच्या वेळी टॅक्सी सहज वेळेत उपलब्ध ही होत नाही. अशावेळी बेस्ट बस हा योग्य आणि चांगला पर्याय नागरिकांसमोर उपलब्ध असतो. अशातच आता बेस्ट बस (BEST BUS) दिवसेंदिवस डिजिटलायझेशनच्या दिशेनं वाटचाल करत आहे. आता बेस्टनं मोबाइल ॲपआधारित टॅक्सीप्रमाणे बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये तुम्ही ऑनलाईन तिकीट (online Ticket)  काढून आपलं आसन आधीच आरक्षित करू शकणार आहात. 

बेस्टनं रविवारी आपला स्थापना दिन साजरा केला. यानिमित्तानं ही सेवा सुरू करण्याचा निर्णय बेस्टनं घेतला. यात मुंबईतल्या दैनंदिन प्रवाशांसाठी चलो पे सेवा(Chalo Pay)सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत बसमध्ये चढल्यानंतर तिकीट खरेदीची पद्धत होती. ही पद्धतच आता बदलण्यात आली आहे. नव्या सेवेनुसार बेस्ट बसमधून प्रवास करण्यासाठी बसमध्ये चढण्यापूर्वीच मोबाईल तिकीट खरेदी करण्याची ही गरज लागणार नाही. प्रवासा आता कोणत्याही बसमध्ये चढू शकतील आणि त्यांच्या मोबईलनं पैसे देऊ शकणार आहेत. प्रवाशांनी पैसे भरल्यावर त्यांचे मोबाईल तिकीट तयार केलं जाईल. 

अधिक वाचा- ग्रहांचे दुष्परिणाम दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात मोरपंख ठरेल फायद्याचे, करा 'हे' उपाय होईल सकारात्मक लाभ

मुंबईतील बेस्ट बसचे प्रवासी आता युपीआय, नेट बँकिंग, डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि इतर ऑनलाइन पेमेंट वापरून मोबाइल वॉलेट रिचार्ज करू शकणार आहेत. त्यानंतर त्यांच्या बस तिकिटांसाठी त्वरित पेमेंटसाठी वॉलेट शिल्लक वापरू शकतात. त्यांना फक्त बस वाहकाला त्याची माहिती द्यावी लागणार असल्याचं बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी सांगितलं आहे. 

प्रवासांनी तिकीट काढल्यावर काय करावं? 

प्रवाशाने त्याचा मोबाईल फोन कंडक्टरच्या तिकीट मशीनजवळ धरून ठेवावा किंवा त्यांच्या तिकिटाचे पैसे देण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर काही मिनिटांत मोबाईल तिकीट तुमच्या अॅपवर दिसेल, असं लोकेश चंद्रा यांनी सांगितलं.

पुढे लोकेश चंद्रा म्हणतात की, ही भारतातील पहिली सार्वजनिक वाहतूक केंद्रीत पैसे भरण्याची कार्य पद्धती आहे. चलो पे हे बेस्ट चलो अॅपवर उपलब्ध आहे असल्याचंही त्यांनी सांगितलं. ही एक ऑफलाइन पेमेंट प्रणाली असून ज्यामुळे अनेक प्रवाशांना फायदा होईल, लोकेश चंद्रा यांनी म्हटलं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी