Bhandara: मामाकडे आला होता शिकायला, खेळण्याच्या नादात गमावला जीव; 5 वीतल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

गावगाडा
Pooja Vichare
Updated Aug 24, 2022 | 09:07 IST

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात (Bhandara District) एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शाळेत मधल्या सुट्टीमध्ये जेवण करून मित्रांसोबत खेळायला गेलेल्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे.

Bhandara News
भंडाऱ्यात विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू 
थोडं पण कामाचं
  • शाळेत मधल्या सुट्टीमध्ये जेवण करून मित्रांसोबत खेळायला गेलेल्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे.
  • खेळण्याचा नाद या विद्यार्थ्याच्या जीवावर बेतला आहे.
  • हा विद्यार्थी पाचवीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त केली जात आहे.

भंडारा: 12 year old drown In Bhandara: भंडारा जिल्ह्यात (Bhandara District) एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शाळेत मधल्या सुट्टीमध्ये जेवण करून मित्रांसोबत खेळायला गेलेल्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तलावात बुडून (Drowning) या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. खेळण्याचा नाद या विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतला आहे. हा विद्यार्थी पाचवीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त केली जात आहे. 

भंडारा जिल्ह्यातील तुमसर (Tumsar, Bhandara) तालुक्यातल्या गावात ही घटना घडली आहे. पाचवीत शिक्षण घेतलेल्या या विद्यार्थ्यांचं वय अवघं 12 वर्ष होतं. देवेंद्र अजय बोंद्रे असं मृत मुलाचं नाव आहे. खेळण्याच्या नादात देवेंद्रचा पाय घसरला आणि त्याचा तोल गेला. धक्कादायक म्हणजे हा विद्यार्थी मामाकडे राहून आपलं शिक्षण घेत होता.

अधिक वाचा- Amitabh Bachchan: बिग बींनी 11.25 मि. केलं महत्त्वाचं Tweet, दिली स्वतःची Health Update

नेमकं कशी घडली घटना?

हसारा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत देवेंद्र अजय बोंद्रे हा विद्यार्थी पाचवीच्या वर्गात शिकत होता. देवेंद्र 10 वाजता शाळेत गेला. शाळेतील मधल्या सुट्टीत जेवण झाल्यानंतर तो आपल्या मित्रांसोबत शाळेजवळच असलेल्या गावातील तलावाकडे खेळायला गेला. तेव्हा त्याच्यासोबत दोन ते तीन मित्रही होते. खेळत असताना तलावातील पाळीवरून त्याचा पाय घसरला. पाय घसरल्यानं देवेंद्र तलावात पडल्यानं बुडू लागला. सोबत असलेल्या विद्यार्थ्यांनी लगेच आरडा ओरड करून गावात येऊन सांगितलं त्यानंतर लगेचच गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली.

पाण्यात बुडत असलेल्या देवेंद्रला बाहेर काढलं आणि तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

देवेंद्र हा मामा रामू हिंगे यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी आला होता.  तो मुळचा निलज येथील रहिवासी होता. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी