Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा रात्री राज्यात, असा असेल राहुल गांधी यांचा आजच्या यात्रेचा कार्यक्रम

गावगाडा
Pooja Vichare
Updated Nov 08, 2022 | 08:58 IST

Bharat Jodo Yatra: हजारो मशाल हाती घेऊन खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वतात निघालेली ही यात्रा सोमवारी रात्री महाराष्ट्रात दाखल झाली आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा सोमवारी 61 व्या दिवशी राज्यात दाखल झाली.

Bharat Jodo Yatra
आज असा असेल राहुल गांधी यांचा कार्यक्रम  
थोडं पण कामाचं
  • काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची (Congress MP Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) तेलंगणामधून महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात दाखल झाली.
  • हजारो मशाल हाती घेऊन खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वतात निघालेली ही यात्रा सोमवारी रात्री महाराष्ट्रात दाखल झाली आहे.
  • काँग्रेसची भारत जोडो यात्रा सोमवारी 61 व्या दिवशी राज्यात दाखल झाली.

मुंबई: Bharat Jodo Yatra: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची (Congress MP Rahul Gandhi)  भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) तेलंगणामधून महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात दाखल झाली.  हजारो मशाल हाती घेऊन खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वतात निघालेली ही यात्रा सोमवारी रात्री महाराष्ट्रात दाखल झाली आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा सोमवारी 61 व्या दिवशी राज्यात दाखल झाली. हा प्रवास महाराष्ट्रात 14 दिवस चालणार आहे. 

सोमवारी रात्री महाराष्ट्रात देगलूर येथे दाखल झाली. यावेळी त्यांच्या सोबत हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. ज्यांच्या हातात मशाली होत्या. या यात्रेचं काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात जंगी स्वागत केलं आहे.  राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत 5 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही यात्रा नांदेड, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यांमधून जाणार आहे. यावेळी अनेक कार्यक्रम, सभा आणि चौकसभांचे आयोजन करण्यात आलं आहे.

अधिक वाचा- खेद व्यक्त करतो आणि माझा शब्द मागे घेतो, सॉरी म्हणत सत्तारांनी घेतले एक पाऊल मागे

आज असा असेल राहुल गांधी यांचा कार्यक्रम 

  • यात्रा रात्री महाराष्ट्रात देगलूर येथे दाखल
  • सकाळी 8.30 वाजता: नांदेडमधील गुरुद्वारापासून यात्रेला सुरुवात होणार
  • सकाळी 9.30 वाजता: अटकाळी गावाजवळ विश्रांती
  • दुपारी 4 वाजता: पदयात्रेला खतगाव फाट्यापासून सुरुवात होणार
  • संध्याकाळी 7 वाजता: संध्याकाळची विश्रांती

तेलंगणातून भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये पोहोचली. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसोबत पुढे जाताना दिसले. महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी 375 किलोमीटरचा प्रवास केला आहे.  या यात्रेत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्यावतीने आदित्य ठाकरे आणि इतर नेते  सहभागी होण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी