उदगीरमध्ये ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अध्यक्षपदी भारत सासणे यांनी एकमताने निवड

९५व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची एकमताने बिनविरोध निवडण्यात आली.आधुनिक मराठी कथांमध्ये भारत सासणे हे अग्रगण्य  कथालेखक आहेत. त्यांच्या विविध पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

Bharat Sasane elected as the President of the 95th Akhil bharatiya sahitya samelan in Udgir
उदगीरमध्ये ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अध्यक्षपदी भारत सासणे यांनी एकमताने निवड  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे
  • साहित्य महामंडळाच्या बैठकीत संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे
  • आधुनिक मराठी कथांमध्ये भारत सासणे हे अग्रगण्य  कथालेखक आहेत.

लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी साहित्य महामंडळाच्या बैठकीत संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे, अशी माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली. (Bharat Sasane elected as the President of the 95th Akhil bharatiya sahitya samelan in Udgir)

काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी खगोलतज्ज्ञ जयंत नारळीकर होते. दरम्यान चार महिन्याच्या आत पुढील साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती नाशिक येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनावेळी देण्यात आली होती. त्यामुळे कोरोना परिस्थिती पाहता येता तीन महिन्यात या संमेलनाची तारीख पक्की होईल. भारत सासणे यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीमुळे त्यांचे अभिनंदन केले जात आहे. सासणे यांनी मराठी साहित्यविश्वात एक मोठं योगदान दिले आहे.

विविध संस्थांचा पाठिंबा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी गेली अनेक वर्षे भारत सासणे यांचे नाव चर्चेत होते. मात्र गेली दोन अध्यक्षपदाच्या निवडीत फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि डॉ. जयंत नारळीकर यांचे नाव निश्चित झाले. त्यामुळे भारत सासणे यांचे नाव मागे पडले. मात्र उस्मानाबाद इथे पार पडलेल्या संमेलनात अध्यक्ष असलेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि नुकत्याच नाशिक साहित्य संमलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर सक्रिय न दिसल्याने यापुढे चालत्या-बोलत्या अध्यक्षाची नेमणूक करा असे महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी बजावून सांगितले. त्यानुसार आता उदगीरमध्ये पार पडणाऱ्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी भारत सासणे यांची निवड करण्यात आली. दरम्यान मराठवाडा साहित्य परिषद आणि उदगिरी महाविद्यालय या संमेलन संस्थांची सासणे यांच्या नावाला पसंती होती. शिवाय महाराष्ट्र साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ तसेच संबंधीत संस्थांनी देखील सासणे यांच्या नावाचा आग्रह केला होता.

कोण आहेत भारत सासणे

भारत जगन्नाथ सासणे जन्म 27 मार्च 1951 रोजी जालना येथे आहे. त्यांनी अहमदनगर मधून बी.एस्सी. ही पदवी. विविध राज्य अधिकारी पदावर त्यांनी काम केले. 1980 नंतरच्या आधुनिक मराठी कथांमध्ये भारत सासणे हे अग्रगण्य  कथालेखक आहेत. नव कथेची सारी आत्मसात करून स्वतःची सुरक्षा, स्वतंत्र बाज निर्माण करणारी सासणे यांनी कथा लिहिली. त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाले आहेत. सासणे हे वैजापूरला 4 एप्रिल 2010 रोजी झालेल्या 5 व्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते. 35 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. नाशिकच्या उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेचे जळगाव येथे 14 फेब्रुवारी 2016 रोजी भरलेल्या एक दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदीही ते होते. 

भारत सासणे यांनी लिहलेली पुस्तके

अदृष्ट (दीर्घकथा संग्रह)
अनर्थ रात्र (दीर्घकथा संग्रह)
दीर्घ (दीर्घकथा संग्रह)
आतंक (दोन अंकी नाटक)
आपली छोटी गोष्ट (कथासंग्रह)
दुस्तर संसार (दीर्घकथा संग्रह)
कॅंप/बाबीं दुःख (दीर्घकथा संग्रह)
चल रे भोपल्या/हंडाभर मोहरा (मुलांसाठी दोन नाटिका)
चिरदाह (दीर्घकथा संग्रह)
जंगलातील दूरचा प्रवास (मुलींसाठी कादंबरी)
चिरदाह (दीर्घकथा संग्रह)
जॉन आणि अंजिरी पक्षी (लेखकाचा कथासंग्रह)
त्वचा (दीर्घकथा संग्रह)
दाट काळा पाऊस (दीर्घकथा)
दूर तेव्हा तेथे दूर तेव्हा/सर्प (दोन कादंबरिका)
दोन मित्र (कादंबरी)
नैनन दहति पावकः
बंद दरवाजा (कथासंग्रह)
मरणरंग (तीन अंकी नाटक)
राहा स्वप्नांचा उलगडा (कादंबरी)
लाल फुलांचे (झाडकथासंग्रह)
वाटा आणि मुक्काम (सहलेखक - आशा बगे, मिलिंद बोकील, सानिया)
विस्तीर्ण रात्र (दीर्घकथा संग्रह)
शुभ वर्तमान (कथासंग्रह)
सटवाईचा लेख (पाच संग्रह पाहिल्या गेलेल्या लेखांचा)
स्यमंतक मण्याचे प्रकरण (कथासंग्रह)
क्षितिजावरची रात्र (दीर्घकथा संग्रह)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी