'भावना' दुखावल्यामुळे खासदार गवळींचा उद्धव ठाकरेंना धक्का, नगरसेवकांचा होता इरादा पक्का

गावगाडा
भरत जाधव
Updated Jul 17, 2022 | 14:41 IST

शिवसेनेमध्ये (Shiv Sena) बंडखोरी करून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत (BJP) सरकार (Govt) स्थापन केले  आहे. साधरण 50 आमदारांच्या सोबतीने एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना धक्का दिला. दरम्यान सरकार स्थापन झाल्यानंतरही शिंदे गटामध्ये (Shinde group) इन्कमिंग सुरूच आहे. आमदारानंतर आता खासदारही उद्धव ठाकरेंना सोडन शिंदे गटात सामील होत आहेत.

Bhavana Gawali likely join Eknath Shinde Group with Corportors
'भावना' दुखावल्यामुळे गवळी गटही झाला शिंदे गटात सामील  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • गवळी समर्थक शिवसैनिकांकडून आंदोलन करण्यात आलं.
  • गवळी गटातील 8 नगरसेवक आणि 30 पदाधिकारी शिंदे गटात जाण्याच्या तयारीत
  • भावना गवळी यांची लोकसभेतील पक्ष प्रतोदपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

यवतमाळ  : शिवसेनेमध्ये (Shiv Sena) बंडखोरी करून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत (BJP) सरकार (Govt) स्थापन केले  आहे. साधरण 50 आमदारांच्या सोबतीने एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना धक्का दिला. दरम्यान सरकार स्थापन झाल्यानंतरही शिंदे गटामध्ये (Shinde group) इन्कमिंग सुरूच आहे. आमदारानंतर आता खासदारही उद्धव ठाकरेंना सोडन शिंदे गटात सामील होत आहेत. आता खासदार भावना गवळी सुद्धा शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. भावना गवळी गटातील 8 नगरसेवकांसह 30 पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहेत. या गटातील भावना गवळी समर्थक नगरसेवक पिंटू बांगर यांनी शिंदे गटात प्रवेश केला  त्यानंतर सर्व समर्थकांनी या गटात प्रवेश केला आहे. 

भावना गवळीचा गट सुद्धा शिंदे गटात सामील झाल्याने यवतमाळ जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. ही घोषणा केली.यवतमाळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला खिंडारपडल्याचे मानले जात आहे. बाभूळगाव नगर पंचायतचे नगरसेवक ,शिवसेना उपजिल्हा प्रमुख ,  युवासेना जिल्हा प्रमुख,असंख्या कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत. शिंदे गटाचे निरीक्षक राजेंद्र फाटक यांच्या उपस्थितीत प्रवेश गवळी समर्थकांनी प्रवेश घेतला.

आमदारानंतर खासदारही शिंदे गटाच्या संपर्कात आहेत, अशा चर्चेचा धूर निघत असताना शिवसेनेने खासदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. काल शिवतारे यांची पक्षातून हकालपट्टी केली. दरम्यान खासदार भावना गवळी यांनीही शिंदे गटाशी नात जुळतं घ्यावं, अशा आशयाचं पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिलं होतं. त्यानंतर शिवसेनेने त्यांची लोकसभेच्या प्रतोदपदावरुन काढून टाकण्यात आलं. दरम्यान आता भावना गवळीच्या गटातील नगरसेवक आणि पदाधिकारी नाराज असून त्यांनी शिंदे गटाकडे जाण्याचा इराद पक्का केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता शिवसेनेला हा पुन्हा एक धक्का मानला जात आहे. 

Read Also: सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात पी. व्ही.सिंधूचा विजय

एकनाथ शिंदे गटाचे ठाण्याचे नगरसेवक राजेंद्र पाठक हे शनिवारपासून यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असून शिंदे गटाच्या समर्थनासाठी चाचपणी करत आहे. कालपर्यंत शिंदे गटाचे समर्थनार्थ आमदार संजय राठोड यांचे कार्यकर्ते होते. मात्र आता खासदार भावना गवळी यांचे कार्यकर्तेही समर्थन दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिंदे गट भक्कम होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, मागील आठवड्यात भावना गवळी (Bhavana Gawali) यांची लोकसभेतील पक्ष प्रतोदपदावरून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेना संसदीय नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं. या पत्रात भावना गवळी यांना प्रतोद पदावरून हटवण्याची मागणी केली होती.

Read Also : महाराष्ट्रातील 'या' शिवमंदिरात नंदीविना विराजमान आहेत महादेव

भावना गवळी यांच्या जागी शिवसेना खासदार राजन विचारे (Rajan Vichare) हे शिवसेनेचे लोकसभेतील नवे प्रतोद असतील. मुख्य म्हणजे राजन विचारे हे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याच्या मतदारसंघातूनच लोकसभेमध्ये निवडून गेले आहेत. शिवसेनेने संसदेचं पावसाळी अधिवेशन आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक तोंडावर असताना भावना गवळी यांची प्रतोदपदावरून हकालपट्टी केली आहे. 

Read Also : सिद्धूला तुरुंगात बनले कारकून तर दलेर मेहंदी झाले हिशोबनीस

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी