मोठी दुर्घटना !, सहलीला घेऊन जाणारी स्कूलबस दरीत कोसळली, 15 विद्यार्थी जखमी

School bus accident in raigad : पुण्याहून रायगड किल्ल्यावर सहलीला आलेल्या स्कूल बसचा अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने बस दरीत कोसळल्याने 15 विद्यार्थी जखमी झाले.

Big accident!, School bus falls into valley in Raigad, 5 students injured
मोठी दुर्घटना !, स्कूलबस रायगडमध्ये दरीत कोसळली, 5 विद्यार्थी जखमी ।   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सहलीला आलेली बस दरीत कोसळली
  • माणगाव-रायगड रस्त्यावर घरोशी वाडी येथे अपघात
  • 15 विद्यार्थी जखमी

रायगड : पुण्याहून शाळेतील विद्यार्थ्यांना सहलीसाठी किल्ले रायगडला आलेल्या खाजगी मिनी बसचा शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. ही बस घरोशी वाडी, ता. माणगाव घाटातील दरीत कोसळली. पण सुदैवाने बस झाडाला आदळल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघात 15 विद्यार्थी जखमी जखमी झाले आहेत. (Big accident!, School bus falls into valley in Raigad, 15 students injured)

अधिक वाचा : खासदार गजानन किर्तीकर बाळासाहेबांच्या शिवसेनेत, CM शिंदेंना दिला पाठिंबा

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील ज्ञान प्रबोधनी शाळेमधील विद्यार्थ्यांची सहल किल्ले रायगडला आली होती. या सहलीसाठी शिक्षक व विद्यार्थी मिनीबसमधून परतत असताना माणगाव-रायगड रस्त्यावरील घरोशी वाडी घाटात बस चालकाचा अचानक ताबा सुटला. त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या 15 ते 20 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने बस झाडाला अडकल्याने बस पलटी झाली. बसमध्ये 40 हून अधिक जण प्रवास करत होते.

अधिक वाचा : येत्या 24 तासात पावसाचा इशारा, जाणून घ्या IMD चे ताजे अपडेट

या अपघातात 15 विद्यार्थी जखमी झाले. तर दोघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातामुळे विद्यार्थी प्रचंड घाबरले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी रवाना झाले. तसेच परिसरातील नागरिक मदतीला धावून आले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी