Eknath Shinde won Bow and Arrow : ठाकरेंच्या हातातून गेली शिवसेना अन् शिवधनुष्य; निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला धक्का

मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण (bow and arrow) चिन्ह मिळाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे.  त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. तर पुढच्या दोन ते तीन महिन्यांत राज्यात महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

Big news  Shinde group gets Shiv Sena name and bow-arrow
राजकारणातील सर्वात मोठी बातमी : शिंदे गटाला मिळालं शिवसेना नाव अन् धनुष्यबाण   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेल्या 1999 च्या पक्षाच्या घटनेत असलेले पक्षांतर्गत लोकशाही निकष बदलण्यात आले.
  • केंद्रीय निवडणूक आयोगाचा शिंदे गटाला दिलासा
  • एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात 40 आमदारांच्यासोबत बंडखोरी केली होती.

Maharashtra Politics : नवी दिल्ली : राजकारणातील (Politics) सर्वात मोठी बातमी समोर आलीय.  आठ महिन्यांपासून शिंदे गट (Shinde group) आणि उद्धव ठाकरे  गटात (Uddhav Thackeray) सुरू असलेला पक्षचिन्हाचा वाद निवडणूक आयोगाने निकाली काढला आहे. मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण (bow and arrow) चिन्ह मिळाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे.  त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. तर पुढच्या दोन ते तीन महिन्यांत राज्यात महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या अगोदर शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानं मोठा दिलासा आहे.  (Election Commission result : Big news  Shinde group gets Shiv Sena name and bow)

अधिक वाचा  :  IPL 2023 Schedule : IPL 2023 चे वेळापत्रक जाहीर

धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाच्या नावासाठी दोन्ही गट कागदपत्रे पुरावे सादर करण्यात व्यस्त होते. या कागदपत्राच्या आधारे निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी सर्वात मोठा भूकंप आला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात 40 आमदारांच्यासोबत बंडखोरी केली होती. एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांना आपल्यासोबत घेऊन सूरत, त्यानंतर गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या.

अधिक वाचा  :  INDvAUS:रविंद्र जडेजाचा फलंदाजीसह गोलंदाजीतही विक्रम

शिंदे गट आणि ठाकरे गट आपलीच शिवसेना खरी असल्याचं म्हणत होते. त्यावेळी दोन्ही गटांनी पक्ष चिन्ह आणि पक्ष नावासाठी निवडणूक आयोगाकडे आग्रही मागणी केली होती. त्यादरम्यान निवडणूक आयोगानं हंगामी निर्णय देताना दोन्ही गटांना वेगवेगळे चिन्ह दिले होते. तसेच दोन्हीपैकी एकाही गटाला शिवसेना हे नाव दिले नव्हते. शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव तर ठाकरेंच्या गटाला शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले होते. मात्र अंतिम निर्णय देताना निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या पारड्यात आपला निर्णय दिला आहे. 

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलं धनुष्यबाण 


शिवसेना पक्षाच्या घटनेत 2018 मध्ये झालेला बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेल्या 1999 च्या पक्षाच्या घटनेत असलेले पक्षांतर्गत लोकशाही निकष बदलण्यात आले. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाच्या घटनेतील बदल निवडणूक आयोगाकडून संमत करुन घेतले होते. पण २०१८ मध्ये झालेले बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आले नाहीत, असं सांगून निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी