मुंबई : मुंबई शहर परिसरात ॲप बेस्ड दुचाकी आणि तीन चाकी टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या चार कंपन्यांना अखेर 30 दिवसांच्या कालावधीसाठी तात्पुरती परवानगी देण्याचा निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या (MMRTA) बैठकीत घेण्यात आलेला आहे. तसेच संबंधित कंपन्यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची पूर्णता पुढील तीन दिवसात केली नाही तर हे लायसन्स रद्द होणार आहे. (Bike-taxi service started in Mumbai, temporary license from Mumbai Transport Department)
अधिक वाचा : चांदोली अभयारण्यात वणवा, वणव्याचे सत्र सुरूच महिन्याभरातील दुसरी घटना
परिवहन विभागाकडे उबर इंडिया, सिस्टम प्राइवेट लिमिटेड,एएनआय टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड, मीडिया माइक प्रायव्हेट लिमिटेड(ऑल माईल्स), महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेड, मेरू मोबिलिटी टेक प्रायव्हेट लिमिटेड, रोपेन ट्रांसपोर्टेशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड (दुचाकी), रोपें ट्रांसपोर्टेशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड (तीनचाकी) या सात कंपन्यांनी मुंबई शहर आणि उपनगरात सेवा सुरु करण्यासाठी लायसन्ससाठी अर्ज केले होते.
अधिक वाचा : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! CNG ६ रुपयांनी तर PNG ३.५० रुपयांनी स्वस्त
सर्वच कंपन्यांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची पूर्णता करण्यात फारच कमी वेळ मिळालेला आहे. परिणामी कमीत कमी वेळेत अधिकाधिक निष्कर्षची पूर्तता करणाऱ्या एएनआय, उबर, महिंद्रा आणि मेरू या चार कंपन्यांना 30 दिवसासाठी तात्पुरत्या स्वरूपातील लायसन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बहुतांश सूचनांचे पालन होत नसल्याने ऑल, माईस, रोपें दुचाकी व तीनचाकी या तिन्ही कंपन्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहे. परिणामी संबंधित कंपन्यांना निष्कर्षांची पूर्तता केल्यानंतर पुन्हा अर्ज करण्याच्या संधी दिली जाणार आहे.