सांगली : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या (sangli dcc bank eletion) कारणावरून नोव्हेंबर महिन्यात आटपाडी तालुक्यात राजकारण चांगलेच तापले होते. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalka) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (ncp) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, आज गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी तो व्हिडीओ 7 नोव्हेंबर 2021 असल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील (jayant patil) पूर्णपणे सामील आहेत, असा आरोप केला. आरोप आरोपानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. (BJP leader Gopichand Padalkar's allegation that Jayant Patil was involved in conspiracy to dump Bhardhav dumper, attack video goes viral)
पडळकर यांनी म्हटले आहे की, हा व्हिडीओ आटपाडी पोलीस स्टेशनच्या दारातला असून तिथं माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला सुनियोजित असून माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूनं 200 ते 300 लोकांचा जमाव लाठ्या काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडफेक करायची आणि गाडीचं स्पीड कमी झाल्यानंतर भरधाव वेगानं डंपर अंगावर घालायचा आणि जमावाकडून हल्ला करुन घ्यायचा असा सुनियोजित कट आखला होता.
आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व हल्ल्याचं चित्रीकरण पोलीस करताना बघायला मिळतात. हा सगळा कट पोलीस सरंक्षणात घडवून आणला जात आहे. सदर घटना थांबवण्याचऐवजी पोलीस चित्रीकरणात मग्न होते. या हल्ल्यात जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामील आहेत, असा दावा पडळकर यांनी केला आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आडपाडीमध्ये ठरावावरून गोपिचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांंमध्ये तणावाची परिस्थिती निर्णाण झाली. यावेळी पडळकर यांच्या ताफ्यातील काही गाड्या फोडल्या होत्या. तर राष्ट्रवादीचे युवक प्रदेश सरचिटणीस राजू जानकर यांचा पाय मोडला होता. पडळकर यांच्या गाडीने आपल्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप राजू जानकर यांनी केला होता. प्रकरणात पोलिसांकडून पडळकर यांच्या बॅाडीगार्डलाच निलंबित केलं आणि पडळकरांवर ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला.