भाजपला शिवसेनेने फसवले, गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रांचा आरोप

BJP was cheated by Shiv Sena, Minister of State for Home Ajay Kumar Mishra alleges : संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या दोघांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आघाडी सरकार अस्तित्वात आणले असा घणाघात केंद्र सरकारचे गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केला.

BJP was cheated by Shiv Sena, Minister of State for Home Ajay Kumar Mishra alleges
भाजपला शिवसेनेने फसवले  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भाजपला शिवसेनेने फसवले
  • गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रांचा आरोप
  • संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी आघाडी सरकार अस्तित्वात आणले

सचिन कांबळे

BJP was cheated by Shiv Sena, Minister of State for Home Ajay Kumar Mishra alleges : उद्धव ठाकरे काही देव नाहीत, ते सांगत आहेत ते सर्व खरे नाही. भाजपला शिवसेनेने धोका दिला. आम्ही आधीपासून  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार असं सांगितले होते. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या दोघांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आघाडी सरकार अस्तित्वात आणले असा घणाघात केंद्र सरकारचे गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केला.

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांनी केलेल्या निवडणूकपूर्व युतीला जनतेने बहुमत दिले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा मिळाला नव्हता. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून निवडणुकीनंतर भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली; असे अजयकुमार मिश्रा म्हणाले.

ईडीची कारवाई

ईडीने कायद्याच्या चौकटीत राहून मागील आठ वर्षात एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तीची संपत्ती जप्त केली आहे.  सध्या ईडी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. न्यायालयाच्या आदेशावरून ही चौकशी सुरू आहे. पाच हजार कोटी रुपयांच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात ही चौकशी सुरू आहे, या प्रकरणात कायद्यानुसार योग्य ते होईल; असे केंद्र सरकारचे गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकार कामगिरीच्या जोरावर मतदारांची मनं जिंकेल आणि २०२४ मध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या राज्यातील निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवेल, असा विश्वास केंद्र सरकारचे गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्रातील नियोजीत रिफायनरी प्रकल्प लवकर व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच हे प्रयत्न यशस्वी होतील, असा विश्वास अजयकुमार मिश्रा यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी