शिंदे गटाच्या खासदाराच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा, चंद्रशेखर बावनकुळेंनी बुलढाण्यातील कार्यकर्त्यांना दिलं टार्गेट

Buldhana : बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रतापराव जाधव विजयी झाले होते. ते जाधव सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. त्यांचे नाव केंद्रातील मोदी सरकार मंत्रीपदासाठी चर्चेत आघाडीवर आहे. अशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बुलढाण्याचा खासदार कमळाचा द्यावा लागेल, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

शिंदे गटाच्या खासदाराच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा,  चंद्रशेखर बावनकुळेंनी बुलढाण्यातील कार्यकर्त्यांना दिलं टार्गेट
BJP's eye on Shinde group's MP's constituency, Chandrashekhar Bawankule targets workers in Buldhana  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भाजपचे महाराष्ट्रासाठी मिशन ४५ सुरु केले आहे
  • चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला
  • २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बुलढाण्याचा खासदार हा कमळावरचा असला पाहिजे, असे भाष्य, केले

बुलढाणा : भाजपने गेल्या वर्षभरापासून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी प्रदेश भाजपने महाराष्ट्रासाठी मिशन ४५ सुरु केले होते. त्यांनी भाजपच्या खासदारांसोबत शिवसेनेचे १८ खासदार असलेल्या मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्याचा प्रत्यय शनिवारी आला. भाजपचे नुतन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुलढाण्यातील भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या सभेमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बुलढाण्याचा खासदार हा कमळावरचा असला पाहिजे, असं भाष्य बावनकुळे यांनी भाष्य केले. (BJP's eye on Shinde group's MP's constituency, Chandrashekhar Bawankule targets workers in Buldhana)

अधिक वाचा : Uddhav Thackeray : होय.. मातोश्रीवरही खोके येतायत, पण... उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलले

लोकसभा प्रवास योजनेंतर्गत शनिवारी बुलढाणा लोकसभा मतदार संघात बैठक पार पडली. येत्या काही दिवसांत केंद्रीयमंत्री मतदार संघात तीन दिवस दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतला. यावेळी आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय कुटे, आमदार श्वेता महाले, आमदार डॉ. रणजितजी पाटील, चैनसुख संचेती, उपेन्द्र कोठेकर, विजयराव शिंदे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा : Thackeray Vs Shinde: शिवसेनेचा वाघ कोण? सुप्रीम कोर्टात उद्या होणार सुनावणी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे काल सायंकाळी बुलडाणा शहरात आले होते. त्यांनी भाजपची जिल्हा बैठक घेतली. यावेळी बावनकुळे यांनी 2024 चा बुलडाणा लोकसभेचा खासदार हा भाजपचाच असेल, अशी घोषणा केली. यामुळे नुकतेच शिंदे गटात गेलेले आणि बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची चांगलीच पंचाईत होणार आहे. भाजपने मिशन बुलडाणा लोकसभा चांगलेच मनावर घेतले. त्यामुळं 2024 मध्ये आपण भाजप-शिंदे सेना युतीचे उमेदवार राहू. या खासदार जाधवांच्या आशेवर पाणी फेरले जाणार असल्याची शक्यता आहे.

अधिक वाचा : MNS: माझ्या नवऱ्याच्या हातात जेव्हा सत्ता येईल तेव्हाच रस्ते चांगले होतील: शर्मिला ठाकरे

यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया देत असताना म्हणाले की, बुलढाण्याचे खासदार हे प्रतापराव जाधव आहेत आणि एकनाथ शिंदे गटामध्ये शिवसेनेचे १२ खासदारांचा लोकसभेतील गट आहे त्यांची आणि आमदारांची भाजपासोबत युती आहे. काल बावनकुळे यांनी बुलढाण्यात येऊन गेले कदाचित ओघात त्यांनी बोलून गेले असतील त्यांना असे बोलायचे असेल की शिवसेना भाजपचा खासदार या ठिकाणी असेल. आणि त्यांनी जाणून-बुजून असे केला असेल तर भविष्यात त्यांच्याकडून असं काही होणार नाही अशा प्रकारची विनंती मी आमच्या वरिष्ठांकडे केली आहे..की ज्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार आणि आमदार आहेत आणि ते भाजप सेनेच्या युती सोबत आहेत त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये. त्यांनी त्या ठिकाणी युतीची भाषा वापरावी, अशा प्रकारची समज देण्यासंदर्भात मी वरिष्ठांना कळवलेले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी