शिवसेनेच्या १८ जागांवर भाजपचा डोळा, जे. पी. नड्डांनी फोडला लोकसभा निवडणुकींचा नारळ

BJP Chief Jp Nadda : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आपला पाया मजबूत करायचा आहे. यासाठी भाजपने शिवसेनेच्या ताब्यातील 18 लोकसभा मतदारसंघ लक्ष्य केंद्रीत केले आहे.

BJP's eye on Shiv Sena's 18 seats, J. P. Nadda started campaigning for the Lok Sabha elections
शिवसेनेच्या १८ जागांवर भाजपचा डोळा, जे. पी. नड्डांनी फोडला लोकसभा निवडणुकींचा नारळ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज महाराष्ट्र दौऱ्यावर
  • चंद्रपूरमध्ये जाहीर सभा
  • नड्डांकडून महाविकास आघाडीवर हल्ला

चंद्रपूर : भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असताना जाहीरसभेत महाविकास आघाडी आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, MVA ने भ्रष्टाचाराची तीन दुकाने उघडली आहेत - उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी. आमच्यासाठी JAM चा अर्थ जन धनासाठी 'J', आधारसाठी 'A' आणि मोबाइलसाठी 'M' असा आहे. तर MVA सरकारसाठी, JAM म्हणजे संयुक्तपणे पैसे मिळवणे. (BJP's eye on Shiv Sena's 18 seats, J. P. Nadda started campaigning for the Lok Sabha elections)

अधिक वाचा : Helicopters Collide In Mid-Air: दोन हेलिकॉप्टरची आकाशात समोरासमोर धडक, चौघांचा मृत्यू (Watch Video)

यावेळी नड्डा यांनी पालघरमधील साधूंवर झालेल्या हल्ल्याचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले, पालघरमध्ये साधूंना कशी वागणूक दिली जाते ते तुम्ही पाहिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या दबावामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाने तपास सीबीआयकडे सोपवला नाही. नड्डा म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस राज्याला विकासाच्या वाटेवर घेऊन जात आहेत.

अधिक वाचा : WhatsApp बंद होणार!, तुमचा स्मार्टफोन हा तर नाही ना?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने मिळून 48 जागा लढवल्या होत्या, ज्यामध्ये भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या आणि शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या.त्या 18 जागांवर भाजपची नजर असून त्या जागाही जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी मिशन मोडमध्ये आले आहेत. या 18 अवघड जागांवर भाजपच्या विजयासाठी पक्षाने आखलेल्या नियोजनानुसार भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी चंद्रपूरमधून प्रचाराची सुरुवात करणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी