SSC HSC exam दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार?

Board proposed SSC HSC written exam माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोविड प्रोटोकॉलचे पालन करुन परंपरागत पद्धतीने दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव राज्याच्या शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आला आहे.

exam
SSC HSC exam दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • SSC HSC exam दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार?
  • दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा प्रस्ताव सादर
  • प्रस्ताव राज्याच्या शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आला

Board proposed SSC HSC written exam मुंबईः कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन नावाचा नवा अवतार सक्रीय झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोविड प्रोटोकॉलचे पालन करुन परंपरागत पद्धतीने दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव राज्याच्या शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आला आहे.

कोरोना संकटाचा आढावा घेऊन शिक्षण विभाग प्रस्तावावर पुढील निर्णय घेईल. आवश्यकता भासल्यास मंडळाचा प्रस्ताव शिक्षण मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळापुढे ठेवतील. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. 

ऑफलाइन परीक्षेचा प्रस्ताव दिला असला तरी शासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करू. योग्य वेळी परीक्षा कशा प्रकारे होईल ते जाहीर करू; असे राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले.

कोरोना संकटाचा विचार करुन परीक्षेसाठी १०० टक्क्यांऐवजी ७५ टक्के अभ्यासक्रमाचाच विचार करावा आणि २५ टक्के अभ्यासक्रम वगळावा असा एक प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर अद्याप शिक्षण विभागाचा निर्णय व्हायचा आहे, अशी माहिती शिक्षण मंडळाने दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी