Mumbai: मुंबईत पुन्हा एकदा धमकीचा कॉल, प्रसिद्ध ललित हॉटेल बॉम्बनं उडवण्याची धमकी; 5 कोटींची मागणी

गावगाडा
Pooja Vichare
Updated Aug 23, 2022 | 11:36 IST

Bomb threat call: आता मुंबईतील प्रसिद्ध ललित हॉटेलला (Lalit Hotel in Mumbai) बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. आता पुन्हा एका धमकीच्या फोनने मुंबई अलर्टवर गेली आहे.

Lalit Hotel
ललित हॉटेल बॉम्बनं उडवून देण्याची धमकी 
थोडं पण कामाचं
  • मुंबई (Mumbai) शहरात एकामागोमाग एक धमकी येत असल्याच्या घटना घडत आहेत.
  • काही दिवसांपूर्वी मुंबई शहरात 26/11 सारखा हल्ला करणार असल्याचा मेसेज मुंबई पोलिसांना (Mumbai Police) मिळाला.
  • आता मुंबईतील प्रसिद्ध ललित हॉटेलला (Lalit Hotel in Mumbai) बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

मुंबई: Bomb threat call at Lalit hotel: मुंबई (Mumbai) शहरात एकामागोमाग एक धमकी येत असल्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई शहरात 26/11 सारखा हल्ला करणार असल्याचा मेसेज मुंबई पोलिसांना (Mumbai Police) मिळाला. त्यानंतर आता मुंबईतील प्रसिद्ध ललित हॉटेलला (Lalit Hotel in Mumbai) बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. आता पुन्हा एका धमकीच्या फोनने मुंबई अलर्टवर गेली आहे. 

सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं हॉटेलमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचं सांगितलं. तसंच हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले बॉम्ब निकामी करण्यासाठी 5 कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. हॉटेल प्रशासनानं पोलिसांना ही माहिती दिली आहे. या फोन कॉलमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा- 'या' भन्नाट अवतारात पाणी पुरी खायला मुंबईच्या रस्त्यावर पोहोचली पूनम पांडे

खंडणीची दिली धमकी 

धमकी देणाऱ्या व्यक्तीने हॉटेलमध्ये 4 ठिकाणी बॉम्ब ठेवला असल्याचं सांगितलं.  खंडणी न मिळाल्यास हॉटेल उडवून देऊ अशी धमकी फोन करणाऱ्या व्यक्तीनं दिली. सध्या धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी सहार पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अज्ञात व्यक्तीविरोधात कलम 385,336 आणि 507 नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

 मुंबईमध्ये 26/11 सारखा हल्ला करणार,   धमकी देणारा संशयित विरारमधून ताब्यात
 
मुंबईत (Mumbai)  पुन्हा एकदा 26/11 सारखा हल्ला (26/11 Attack) करून शहर उडवून देण्याचा मेसेज आल्यानं एकच खळबळ उडाली. यानंतर याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  ज्या क्रमांकावरून मुंबईवर 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देणारे मेसेज पाठवण्यात आले होते. त्याचा कोड पाकिस्तानचा (Pakistan)  आहे. या प्रकरणी विरारच्या भाटपाडामधून मोहम्मद असेच या 22 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेचे पथक मोहम्मद याची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. हा मेसेज कुठून आणि कसा आला त्याचीही इतर यंत्रणामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

शुक्रवारी रात्री मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागात मुबारक हो मुंबई में हमला होने वाला है, असे धमकीचे 26 मेसेज (26 message Mumbai Police) मुंबई पोलिसांना आले आहेत. मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक हेल्पलाइनच्या व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज आले होते. असे 26 मेसेज पोलिसांना आले आहेत. मुंबई पोलिसांनी  खबरदारीचा इशारा म्हणून सुरक्षेत प्रचंड वाढ केली आहे. या मेसेज प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत.  या मेसेजमध्ये 6 दहशतवादी भारतात पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच लवकरच मुंबईत 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. या मेसेजनंतर एकच खळबळ उडाली आहे.  मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी