"मेरा आवाज, हिंदुस्थान का आवाज" म्हणणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंचा चार दिवस सातारा पोलीस कोठडीत मुक्काम

मेरा आवाज, हिंदुस्थान का आवाज म्हणणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंचा चार दिवस सातारा पोलीस कोठडीत मुक्काम

Breaking News
मेरा आवाज, हिंदुस्थान का आवाज म्हणणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंचा चार दिवस सातारा पोलीस कोठडीत मुक्काम  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शरद पवारांच्या घरासमोरी आंदोलनानंतर सदावर्तेंवर गुन्हा दाखल
  • आक्षेपार्ह्य विधान केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं
  • सातारा जिल्हा न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या कचाट्यात अडकलेल्या अॅड गुणरत्न सदावर्ते ((Gunratna Sadavarte)) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान, आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्यानंतर आज न्यायालयात हजर केले असता मेरा आवाज, हिंदुस्थान का आवाज अशा घोषणा सदावर्ते यांनी दिल्या.  त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. (Breaking! Gunaratna Sadavarten remanded in Satara police custody for four days)

अधिक वाचा : राज ठाकरेंना लाऊडस्पीकरचा झटका! मनसेच्या अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी 'जय महाराष्ट्र'

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर राडा करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, मराठा आरक्षण प्रकरणी एका वृत्तवाहिनीवरती संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह्य विधान केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर ऑक्टोबर २०२० मध्ये सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी सातारा पोलिसांनी सदावर्तेंना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस ठाण्यात हजर केले असताना मराठा संघटनांच्यावतीने सदावर्तेंच्याविरोधात घोषणाबाजी केली होती.

अधिक वाचा : Raj Thackeray: राज ठाकरेंच्या आंदोलनाचे उत्तरप्रदेशात उमटले पडसाद? मशिदींसमोर वाजू लागली हनुमान चालीसा 

सातारा जिल्हा न्यायालयात आज सदावर्ते यांना हजर करण्यात आले. मराठा संघटनांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलीस ठाणे आणि न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सदावर्ते यांना न्यायालयात घेऊन जात असताना सदावर्ते यांनी वंदे मातरम, जय हिंद, मेरा आवाज, हिंदुस्थान का आवाज अशा स्वतःच घोषणा दिल्या. न्यायालयात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी