Ulhasnagar : भय इथले संपत नाही..., स्लॅब कोसळून चौघांचा मृत्यू ; ओटी चौकातील मानस टाॅवर इमारतीतील घटना

BUILDING SLAB COLLAPSE I उल्हासनगरमधील पाच मजली इमारतीचा चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळला. या अपघातात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

Building accident in Ulhasnagar, 4 killed
Ulhasnagar : भय इथले संपत नाही..., स्लॅब कोसळून चौघांचा मृत्यू ; ओटी चौकातील मानस टाॅवर इमारतीतील घटना ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उल्हासनगरात पुन्हा एकदा इमारत दुर्घटना
  • या दुर्घटनेत इमारतीमधील काहीजण जण ढिगाऱ्याखाली दबले गेले.
  • या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी

ठाणे : उल्हासनगर येथील ओटी चौकातील मानस टाॅवर या पाच मजली इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. (Building accident in Ulhasnagar, 4 killed)

अधिक वाचा : Mumbai-Goa Highway : अंजनारी पुलावरून टँकर पलटी; चालक जागीच ठार, नदीत गॅसची गळती

उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 परिसरात मानस टॉवर नावाची पाच मजली इमारत आहे. या इमारतीत एकूण 30 फ्लॅट आहेत. ही इमारत धोकादायक असल्याने या इमारतीतील रहिवाशांना दोनदा नोटिसा बजावण्यात आल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.   मानस टॉवर ही इमारत उल्हासनगर महापालिकेकडून धोकादायक घोषित करून संपूर्णपणे रिकामी करण्यात आली होती. मात्र तरीही या इमारतीत काहीजण लपून-छपून वास्तव्य करत होते. त्यामुळे आज दुपारी ही दुर्घटना घडल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकून चार जणांचा मृत्यू झाला. सागर ओचानी, रेणू धनवानी, धोलानदास धनावनी, प्रिया धनवानी अशी या चार मृतांची नावं आहेत.

ढिगाऱ्याखाली चार ते पाच जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून ढिगारा काढण्याचे काम हाती घेण्यात आलो आहे. सध्या पालिका अधिकारी, पोलीस अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यात सुरु आहेत.

 उल्हासनगरमध्ये दर पावसाळ्यात इमारतींचे स्लॅब पडण्याच्या घटना घडतात. गेल्या वर्षी मोहिनी पॅलेस आणि साईशक्ती या दोन इमारतींचा स्लॅब कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला होता, तर गेल्या महिन्याच्या 25 तारखेला स्थानिक गोल मैदान येथील कोमल पार्कच्या पाचव्या मजल्याचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला होता. तर लोकल कॅम्प क्रमांक 3 मध्ये एका दुमजली घराच्या बाल्कनीचा काही भाग कोसळून शेजारच्या घरावर पडून दोन जण जखमी झाले, त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी