विहिरीत सापडले ५ जणींचे मृतदेह, पाहा कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार 

गावगाडा
रोहित गोळे
Updated Sep 23, 2019 | 14:30 IST

5 Dead Bodies Found: बुलडाण्यातील माळेगाव येथे तब्बल ५ जणींचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. पाचही जणींचे मृतदेह हा गावातीलच एका विहिरीत सापडले आहेत. 

buldhana dead bodies of 4 girls, including a mother were found in well
विहिरीत सापडले ५ जणींचे मृतदेह, पाहा कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • बुलडाणात एकाच विहिरीत ५ जणींचे मृतदेह सापडले 
  • चार मुलींसह आईचा मृतदेह सापडल्याने बुलडाण्यात खळबळ 
  • पोलिसांनी पाचही जणींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले

बुलडाणा: बुलडाणामधील मेहकर तालुक्यातील माळेगाव येथे आज (सोमवार) एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबाताील ५ महिलांचा मृतदेह हे विहिरीत सापडले आहेत. ज्यामधे आईसह ४ मुलींचा समावेश असल्याचं समजतं आहे. दरम्यान, ही हत्या आहे की आत्महत्या आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. पण या घटनेमुळे संपूर्ण गावात बरीच खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाचही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. हे पाचह मृतदेह आता शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येणार आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, माळेगाव येथील एका विहिरीत पाचही जणींचे मृतदेह आढळून आले आहेत. यात एका ३५ वर्षीय महिलेसह तिच्या चार मुलींचा समावेश आहे. या चारही मुली अल्पवयीन आहेत. त्यापैकी एक मुलगी ही अवघ्या एका वर्षाचीच असल्याची माहिती मिळते आहे. 

मृतांची नावे: 

  1. उज्ज्वला ढोके (वय ३५ वर्ष)
  2. वैष्णवी ढोके (वय ९ वर्ष)
  3. दुर्गा ढोके (वय ७ वर्ष)
  4. आरुषी ढोके (वय ४ वर्ष)
  5. पल्लवी ढोके (वय १ वर्ष)

एकाच वेळी चारही जणींचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याने आता याप्रकरणी गावात अनेक प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पण या पाचही जणींच्या मृत्यूबाबत नेमकी माहिती समजू शकलेली नाही. 

पोलिसांनी पाचही जणींचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी देखील पाठविण्यात आले आहे. त्यानंतरच या पाचही जणींच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकतं. दरम्यान, पोलीस सध्या या घटनेमागील प्रत्येक पैलू तपासून पाहत आहे. तसंच गावातील आणि मृत महिलांच्या कुटुंबीयांशी देखील त्यांच्याबाबत जाणून घेत आहेत. 

एकाच वेळी पाच जणींचे मृतदेह सापडल्याने पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. त्यामुळे या पाच जणींची कुणी हत्या केली की, त्यांनीच आत्महत्या केली हे सर्वात आधी शोधून काढण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणी सध्या कसून तपास करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी