लोणावळा : जु्न्या मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळानजीक बोरघाटात मोठी दुर्घटना घडली आहे, एक हायस्पीड प्रवासी बस खोल दरीत कोसळली. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे, घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे. (Bus falls into ravine on Mumbai-Pune route; 8 people died)
अधिक वाचा : पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी का आणि कुणाची मागितली माफी?
मिळालेल्या माहितीनुसार ही खासगी बस पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती. पहाटे 4 वाजेच्या सुमारास बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ चालकाचा ताबा सुटल्याने बस जवळच्या दरीत जाऊन कोसळली. या बसमध्ये 40 ते 45 लोक होते.
अधिक वाचा : मुंडे भाऊ बहिणीचे मनोमिलन चर्चेंनंतर एका राजकीय षडयंत्राची बीडमध्ये चर्चा
या भीषण अपघातामध्ये 13 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 20 ते 25 लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पहाटेपासून पोलीस, स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच अपघातानंतर तातडीने मदतकार्यात सहभागी झालेल्या हायकर्स आणि आयआरबी टीममधील तरुणांशीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली, या संकटसमयी मदतकार्यात तातडीने धावून आल्याबद्दल या टीमच्या सदस्यांचे त्यांनी कौतुक केले.