Maharashtra Government: 3 तारखेच्या आधी 101 टक्के शपथविधी होणार?, आमदारानं सांगितली 'अंदर की बात'

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 29, 2022 | 07:18 IST

Eknath Shinde New Cm: राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन महिना होत येईल मात्र अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. केवळ मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis)  यांनी शपथ घेतली आहे.

Eknath Shinde and Devendra Fadnavis
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस 
थोडं पण कामाचं
  • केवळ मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis)  यांनी शपथ घेतली आहे.
  • शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार असा प्रश्न आता विचारला जात आहे.
  • शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिलं आहे.

मुंबई: Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्र सध्या शिंदे आणि फडणवीसांचं सरकार (Government of Shinde and Fadnavis) आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन महिना होत येईल मात्र अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. केवळ मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार असा प्रश्न आता विचारला जात आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar )  यांनी उत्तर दिलं आहे. एबीपी माझानं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे

येत्या 3 ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. पुढे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, राज्यातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चर्चा करताहेत. या चर्चेदरम्यान कोणते जिल्हे ते घेतील कोणते जिल्हे आम्हाला मिळतील यावर चर्चा सुरू आहे. त्यांचे किती मंत्री असतील, आमचे किती आमदार मंत्री होतील. यावर बोलणी सुरू असतील. मात्र अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. मला असं वाटतं पुढील दोन दिवसात अंतिम निर्णय होईल आणि 3 तारखेच्या आत शपथविधी होईल. 

अधिक वाचा- Rajasthan: बाडमेरमध्ये हवाई दलाचं MiG-21 कोसळलं, दोन्ही पायलट शहीद

3 तारखेच्या आधी 101 टक्के शपथविधी होईल, असं अब्दुल सत्तार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत जोर देऊन म्हणालेत. 

आताच्या सरकारमध्ये ते मंत्री होणार का?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सत्तार म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघे जे निर्णय घेतात, त्यांना त्यात अनेक अडचणी येतात. त्या अडचणींमधून आम्हाला मंत्री करण्यात त्यांना काही अडचणी येत असेल, तर ते त्या अडचणीप्रमाणे निर्णय घेतील. आम्ही शिंदे यांच्यासोबत कोणत्याही अटी ठेवून आलो नसल्याचं सत्तार यांनी स्पष्ट केलं आहे. अब्दुल सत्तार गेल्या सरकारमध्ये मंत्री होते. 

आदित्य ठाकरेंना दिलं उत्तर 

बंडखोर आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून यावं असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं होतं. यावर सत्तार यांनी आदित्य ठाकरे प्रत्त्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री शिंदे यांना विनंती करणार आहे की, मला राजीनामा देण्याची परवानगी द्यावी. 31 तारखेला आमच्याकडे मेळावा आहे. त्यात शिंदे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्या दिवशी शिंदे यांची परवानगी घेणार आणि राजीनामा देणार. राजीनामा देऊन मी 
पुन्हा निवडून येईल असा विश्वासही सत्तार यांनी बोलून दाखवला. 

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले 

बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याचं उत्तर दिलं आहे.  येत्या तीन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)  यांनी सांगितलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, येत्या तीन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना शिंदे म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब झाला यात शंका नाही. मात्र याबाबत कोणत्याही स्तरावर वाद नाही. येत्या तीन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार करू. मंत्रिपदाच्या निवडीबाबत कोणताही वाद नाही, हे पुन्हा एकदा सांगतो. आता यात विलंब होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. 

अधिक वाचा- Congress: 'सरकार पडेल या भीतीमुळे...', नाना पटोलेंची भाजपवर तुफान टीका

गेल्या महिन्यात नव्या मुख्यमंत्र्यांनी घेतली शपथ 

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवीन राज्य सरकारने 30 जुलै रोजी शपथ घेतली आणि सध्या राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोनच सदस्य आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 39 आमदारांनी बंड केला. या बंडानंतर महाविकास आघाडी (MVA) सरकार अल्पमतात आली. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपआपल्या पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून शिंदे यांनी चार वेळा दिल्लीला भेट दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी