catfish । अहमदनगरमध्ये 'मांगूर'च्या तस्करीचा पर्दाफाश; 3 टन मुद्देमालासह 8 जणांना अटक

ban on mangur fish : बहुतांश मासे हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण काही निवडक मासे आरोग्याला घातक देखील असतात. असाच एक मासा आहे मांगूर मासा, मोठ्या डोक्याचा, मिश्या असलेला हा मासा आरोग्यास धोकादायक असल्याने भारत सरकारने त्याच्या पाळण्यावर आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली होतीय. त्या माशाची चोरटी वाहतूक होत असल्याची घटना श्रीरामपूरमध्ये समोर आली आहे.

थोडं पण कामाचं
  • बंदी घातलेल्या मांगूर माशाची तस्करी
  • श्रीरामपूर पोलिसांनी पकडला टेम्पो
  • ३ टन माशांसह टेम्पो जप्त,

अहमदनगर : बहुतांश मासे हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण काही निवडक मासे आरोग्याला घातक देखील असतात. असाच एक मासा आहे मांगूर मासा, मोठ्या डोक्याचा, मिश्या असलेला हा मासा आरोग्यास धोकादायक असल्याने भारत सरकारने त्याच्या पाळण्यावर आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली होतीय. त्या माशाची चोरटी वाहतूक होत असल्याची घटना श्रीरामपूरमध्ये समोर आली आहे. (catfish. 'Mangoor' smuggling busted in Ahmednagar; 8 people arrested with 3 tons of valuables)

अधिक वाचा : ​Pune: सेक्सटॉर्शनमुळे पुण्यातील तरुणाची आत्महत्या, प्रकरणाचे धागेदोरे पोहोचले थेट राजस्थानपर्यंत

अहमदनगर जिल्ह्यामध्ये मांगूर माशावर बंदी असतांना देखील तस्करी होत असल्याची माहिती श्रीरामपूर पोलिसांना मिळली. त्यानुसार सापळा रचून नेवासा मार्गे मुंबईला जाणाऱ्या आयशर ट्रक ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्यामध्ये  3 टन मांगून मासा आढळून आला आहे.   मत्स्य विभागाच्या वतीने हे मासे नष्ट करण्यात आले आहे. तसेच या माशांची तस्करी करणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. 

हवालदार क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन असादुल मंडल मुफूजर रेहमान मंडल (रा.पश्चिम बंगाल), अर्षद बाबुराली गाझी (रा. पश्निम बंगाल), मनोज रामधन यादव (हल्ली रा.रामधन यादव दत्त मंदिर चाळ, ठाणे, मुळ रा.मझाँवों, ता.बेल्लधारोड, जि.बलिया), विवेकानंद आत्मज उमाशंकर (रा.ग्राम पचवनिया, पोस्ट पचवनिया चकिया चंदौली, उत्तर प्रदेश), सुनील यादव (रा.चेरुइडीह बंदु कला मऊ, उत्तर प्रदेश), प्रदीपकुमार कंन्कराज मोरी (हल्ली रा.गळनिंब ता. नेवासे, मुळ रा.कैकलोरु, आंध्रप्रदेश), मुक्कमल विश्वास (वाहन मालक), मोहनेश्वर गणगे (जागा मालक) अशी आरोपींची नावे आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी