megablock on 16 jan 2022 : रविवार १६ जानेवारी रोजी उपनगरीय रेल्वेचा मेगाब्लॉक

गावगाडा
Updated Jan 14, 2022 | 19:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mumbai Local Mega Block | मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाने रविवार १६ जानेवारी रोजी मेन लाइन आणि हार्बरवर मेगाब्लॉक घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

Central Railway to operate Mega block on suburban sections on Sunday
मध्य रेल्वेचा रविवारी उपनगरीय भागांवर मेगाब्लॉक   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मध्य रेल्वे विभागाने रविवार १६ जानेवारी रोजी मेन लाइन आणि हार्बरवर मेगाब्लॉक घेणार असल्याचे जाहीर केले
  • मेगाब्लॉक काळात रेल्वे वाहतुकीत बदल
  • प्रवाशांनी बदलांची माहिती घेऊन प्रवासाचे नियोजन करावे

Mumbai Local Mega Block | मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाने रविवार १६ जानेवारी रोजी मेन लाइन आणि हार्बरवर मेगाब्लॉक घेणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबतची अधिकृत माहिती रेल्वे विभागातर्फे एक निवेदन जारी करून देण्यात आली आहे. मेगाब्लॉक काळात रेल्वे वाहतुकीत बदल करण्यात येतील. यामुळे प्रवाशांनी बदलांची माहिती घेऊन प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.४४ या वेळेत सुटणाऱ्या जलद सेवा देणाऱ्या सर्व ट्रेन माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवल्या जातील. माटुंगा आणि मुलुंड यादरम्यान धावणाऱ्या गाड्या त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांनुसार स्थानकांवर थांबतील. तर ठाण्याच्या पलीकडे असलेल्या जलद मार्गावरील गाड्या मुलुंड येथे डाऊन फास्ट मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि त्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. तसेच ठाण्याहून सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२६ वाजेपर्यंत अप जलद सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. दरम्यान मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांनुसार स्थानकांवर थांबेल. पुढे या अप जलद सेवा माटुंगा येथे अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. (Central Railway to operate Mega block on suburban sections on Sunday). 

हार्बर लाईन

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० अशी राहिल. तर रविवारी सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीहून सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रेहून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. लक्षणीय बाब म्हणजे ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मुख्य लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी