'छेड़ोगे तो छोड़ेंगे नहीं', PFI मुंब्राच्या अध्यक्षाने राज ठाकरेंना दिलं चॅलेंज

Loudspeaker Controversy : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याची मागणी केल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने मोठा इशारा दिला आहे. छेडछाड कराल तर सोडणार नाही, असे म्हणत मुंब्रा, पुण्यात निदर्शने करण्यात आली. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीबाहेर अनेक अल्पसंख्याक जमा झाले होते.

'Chhedoge to chodenge nahi', PFI Mumbra president challenges Raj Thackeray
'छेड़ोगे तो छोड़ेंगे नहीं', PFI मुंब्राच्या अध्यक्षाने राज ठाकरेंना दिलं चॅलेंज ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींतील भोंगे बंद करण्याची मागणी केली होती
  • हनुमान जयंतीला पीएफआयने नवी ठिणगी पेटवण्याचा प्रयत्न केला आहे.
  • पीएफआयची राज ठाकरेंना धमकी

ठाणे : मशिदींमधील लाऊडस्पीकरवर राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता हे प्रकरण तापले आहे. या मुद्द्यावरून आता पॉप्युलर फ्रंटने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला इशारा दिला आहे. पॉप्युलर फ्रंटशी संबंधित मतीन शेख यांनी सांगितले की, जर तुम्ही मशिदीच्या कोणत्याही भोंग्यांला हात लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही समोर उभे असलेले दिसतो. ('Chhedoge to chodenge nahi', PFI Mumbra president challenges Raj Thackeray)

ठाण्यातील मुस्लिमबहुल भाग असलेल्या मुंब्रा अध्यक्ष मतीन शेखानी यांनी मध्य प्रदेश, राजस्थानसह इतर राज्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने (PFI) मोठा इशारा दिला आहे. छेडछाड कराल तर सोडणार नाही, असा इशारा दिला. मुंब्रा येथे शुक्रवारच्या नमाजानंतर अनेक अल्पसंख्याक मशिदीबाहेर जमले होते.

म्हाला देशात शांतता हवी आहे, मात्र तुम्ही भोंग्यांना हात लावलात तर आम्हीही गप्प बसणार नाही, असे पीएफआय मुंब्राचे अध्यक्ष मतीन शेखानी यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी मतीन शेख म्हणाले की, अजानमुळे काही लोकांना त्रास होत असल्याचे काही लोक म्हणाले, परंतु अशा लोकांना आम्ही एवढेच सांगू इच्छितो की आमची शांती हीच इच्छा आहे. शेखानी म्हणाले की, मला असे म्हणायचे आहे की, काही लोक मुंब्र्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अजानमुळे काहींना त्रास होत आहे. काही लोकांना आमच्या मदरसा आणि मशिदीचा त्रास होत आहे. मला त्यांना एकच संदेश द्यायचा आहे की आम्हाला शांतता हवी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी