मुंबई: Shiv Sena chief uddhav Thackeray Birthday Today: आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री (Former Maharashtra Chief Minister) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांचा 62 वा वाढदिवस (birthday) आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री बंगल्यावर कार्यकर्त्यांची मोठी पाहायला मिळतेय. कोरोना काळानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतून बंड करून राज्यात नवी सत्ता स्थापन केलेल्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड केला. यावेळी त्यांना शिवसेनेतल्या आमदारांनी साथ दिली. या आमदारांच्या मदतीनं भाजपसोबत हातमिळवणी करत एकनाथ शिंदेंनी राज्यात नवीन सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. मात्र आज उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एकनाथ शिंदेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अधिक वाचा- आता भारतातही मंकीपॉक्सचा कहर, देशात कधी येणार लस?; अदार पूनावाला यांनी स्वतः सांगितला संपूर्ण प्लान
सोशल मीडियावर शुभेच्छा देताना एकनाथ शिंदे यांनी लिहिलं की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना....
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.... — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 27, 2022
वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना खास आवाहन
आज सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत उद्धव ठाकरे शुभेच्छांचा स्विकार करणार आहेत. मात्र फक्त शुभेच्छा द्या, हारतुरे नको, पुष्पगुच्छ आणि फोटोफ्रेम्स नको, असं आवाहन उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसैनिकांना करण्यात आलं आहे. तुमच्या शुभेच्छा निश्चितच स्वीकारेन, तो शिवसैनिकांचा अधिकारच आहे. पण कृपया पुष्पगुच्छ वगैरे काही आणू नका, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
उद्धव ठाकरे यांचा आज 62 वा वाढदिवस
उद्धव ठाकरे यांचा जन्म 27 जुलै 1960 रोजी झाला. आज ते आपला 62 वा वाढदिवस साजरा करत आहेत. उद्धव ठाकरेंनी शालेय शिक्षणानंतर पदवीचं शिक्षण मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्टसमधून पूर्ण केलं. उद्धव ठाकरेंना फोटोग्राफीची आवड आहे. पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ही दोन मुले असा त्यांचा परिवार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 2002 मध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर 2003 मध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष बनले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 2004 मध्ये उद्धव ठाकरे यांना उत्तराधिकारी जाहीर केलं होतं.