Eknath shinde : गड्या आपला गावच बरा.., सुट्टीवर आलेले मुख्यमंत्री शिंदे रमले शेत-शिवारात

CM Eknath shinde in satara : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसाच्या सातारा दौऱ्यावर असून त्यांचे मुळगाव असलेल्या महाबळेश्वर येथील दरे गावातील स्वतःच्या शेताची पाहणी करत शेतीमध्ये सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला .

Hamirpur Murder After Kidnapping
Eknath shinde : गड्या आपला गावच बरा.., सुट्टीवर आलेले मुख्यमंत्री शिंदे रमले शेत-शिवारात  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसाच्या सातारा दौऱ्यावर
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या शेताची पाहणी
  • शेतीच्या कामाचा घेतला आढावा

सातारा : राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि आमदारांची अपात्रता आदी मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयात घटनापीठापुढे आज सुनावणी सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांसाठी सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी मुक्कामी आले आहेत. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत:च्या शेताची पाहणी करुन शेतातील पिकाची मशागतही केली. (Chief Minister Shinde inspected his own farm)

अधिक वाचा : आदित्य ठाकरे यांचा मराठवाडा दौरा करणार, नुकसान झालेल्या पिकांची करणार पाहणी

मुख्यमंत्री दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यात आहेत. सोमवारी ते आपल्या मूळगावी महाबळेश्वर दरे येथे आले. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते यापूर्वी गावी आले होते पण त्यांना मुसळधार पावसामुळे ग्रामदैवत उत्तरेश्वराचे दर्शन घेता आले नव्हते. त्यामुळे गावी आल्याआल्या त्यांनी प्रथम आपल्या ग्रामदैवताचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सातारा जिल्ह्यातील प्रशासकिय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील पर्यटनाच्या वाढीसाठी कशा पद्धतीने प्रयत्न करता येतील, याबाबत चर्चा केली. गावचा सुपुत्र राज्याचा मुख्यमंत्री झाल्याने गावकऱ्यांनीही एकनाथ शिंदे यांचं जल्लोषात स्वागत केले.

मंगळवारी सकाळी-सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शेतात फेरफटका मारला. त्यांच्या शेतात चंदन त्यात गवती चहा, हळद ,हिरवी मिरची आदी पिकांची लागवड केली आहे. त्याची पाहणी केली. त्यानंतर शेतात आज स्ट्रॉबेरीची लागवडीचे काम सुरू होते. तिथे त्यांनी लागवडीच्या कामाला शेतमजूरांसोबत हातभार लावला. तसेच कोळप्याच्या सहाय्याने हळदीतील गवत काढले. 

अधिक वाचा : नागपूर महामार्गावर Burning बसचा थरार; 35 प्रवासी असलेल्या ST ला भीषण आग

दुपारी शेतातील कामे आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी इलेक्ट्रिक बग्गीमधून गावात फेरफटका मारत ग्रामस्थांशी संवाद साधला. आज मुख्यमंत्र्यांच्या गावच्या परिसरात मस्त गुलाबी थंडी,पूर्ण सूर्य प्रकाश असल्याने रोजच्या दगदगीतून गावी आल्यामुळे मुख्यमंत्री आनंदी आणि उत्साही दिसत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी