Vidhansabha: 50 खोकेवरुन झोंबाझोबी... विधानसभेच्या पायऱ्यांवरच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की

गावगाडा
रोहित गोळे
Updated Aug 24, 2022 | 12:16 IST

Vidhansabha clash between ruling and opposition mla: 50 खोके यावरुन दिल्या जाणाऱ्या घोषणाबाजीवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला आहे. ही सगळी कॅमेऱ्यात कैद झाली असून दोन्ही बाजूच्या आमदारांवर आता सामान्य नागरिक टीका करत आहेत.

clash between ruling and opposition mla on the steps of vidhansabha
Vidhansabha: 50 खोकेवरुन झोंबाझोबी... विधानसभेच्या पायऱ्यांवरच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र विधानसभेच्या पायऱ्यांवर आमदारांवर धक्काबुक्की
  • राष्ट्रवादी आमदार आणि सत्ताधारी आमदार एकमेकांना भिडले
  • विरोधकांच्या ५० खोकेंच्या घोषणाबाजीवरुन सत्ताधारी संतापले

Vidhansabha clash: मुंबई: महाराष्ट्र विधीमंडळाच्या इतिहासात आजवर कधीही न झालेला प्रकार अवघ्या महाराष्ट्राला (Maharashtra) पाहायला मिळाला आहे. गेले अनेक दिवस विरोधक (opposition) हे ५० खोकेंवरुन सत्ताधाऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आज (2४ ऑगस्ट) विधानसभेचं (Vidhansabha) कामकाज सुरु होण्याच्या आधी विरोधकांऐवजी सत्ताधारी आमदारच (Ruling MLA) विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करु लागले. 'लवासाचे खोके, बारामती एकदम ओक्के, एकदम ओक्के..' अशा घोषणा शिंदे गट (Shinde Group) आणि भाजप (BJP) आमदारांनी देण्यास सुरुवात केली. ज्यामळे विधानसभेच्या पायऱ्यांवरच मोठा गदारोळ पाहायला मिळाला. (clash between ruling and opposition mla on the steps of vidhansabha)

ही सगळी घोषणाबाजी सुरु असातानाच विरोधी पक्षाचे आमदार हे देखील पायऱ्यांवर घोषणाबाजी करु लागले. मात्र सत्ताधारी आमदारांनी लवासावरुन राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न झाला. ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चांगलेच संतप्त झाले. यावेळी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात धक्काबुक्की झाली. याशिवाय इतर काही आमदारांमध्येही धक्काबुक्की झाली. यामुळे विधानभवना बाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. 

अधिक वाचा: मी काय पैशासाठी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही: रवी राणा

मात्र, वेळीच दोन्ही बाजूकडच्या काही आमदारांनी मध्यस्थी करत आक्रमक आमदारांना बाजूला केलं. मात्र, या सगळ्या प्रकारामुळे महाराष्ट्रात कधीही न झालेला प्रकार आज यानिमित्ताने पाहायला मिळाला. यावरुन आता दोन्ही बाजूकडील आमदारांवर सामान्य नागरिकांकडून टीका केली जात आहे. 

५० खोकेंची घोषणा शिंदे गटाला झोंबली: अजित पवार 

'महाराष्ट्रातील सगळी जनता बघतेय की, १७ तारखेला अधिवेशन सुरु झालं. आम्ही रोज सुरुवातीला या पायऱ्यांवर येऊन घोषणा द्यायचो. परंतु त्या घोषणा शिंदे गटाला त्यांच्या आमदारांना एवढ्या झोंबल्या की, कधीही आतापर्यंत मी बरेच वर्ष इथे काम करतोय. आम्ही सत्तेवर असताना देखील विरोधी पक्ष इथे घोषणा द्यायचा. आम्ही कधी त्यांना अडवलं नाही. परंतु आज जाणीवपूर्वक ज्या पद्धतीने महाराष्ट्रात या सगळ्या घोषणा दाखवल्या गेल्या. त्यामुळे जनमानसात त्यांची प्रतिमा मलीन झाली की काय अशी शंका त्यांनाच आली.' 

अधिक वाचा: Maharashtra Monsoon Assembly Session : अधिवेशनाचे दोनच दिवस उरले; होणार फूल राडा, आज पाचव्या दिवशी संघर्ष तीव्र होणार

'म्हणजे आपल्या मराठी भाषेत म्हणतात की, चोराच्या मनात चांदणं. त्यातला प्रकार घडला. वास्तविक आता उद्याचा शेवटचा दिवस आहे. आम्ही सगळे महाविकास आघाडीचे आमदार साडे दहा वाजता एकत्र यायचो आणि इथे एकंदरीतच वेगवेगळ्या घोषणा देण्याचं काम व्हायचं. परंतु त्यातील ५० खोके एकदम ओके ही घोषणा त्यांना एवढी जिव्हारी लागली एवढं ते नाराज झालेले दिसतायेत त्यामुळे आज त्यांच्यातील काही आमदार इथे आले आहेत आणि समोर येऊन घोषणा देत आहे.' असं म्हणत अजित पवार यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर जोरादार टीका केली.  

आम्ही काय बांगड्या भरल्यात का?, आमचा नाद करायचा नाही...: भरत गोगावले  

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आमदारांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीनंतर अत्यंत आक्रमकपणे प्रतिक्रिया दिली. '१०७ असे ते लोकं होते. अशावेळी आम्ही १७० लोकं आलो असतो तर काय झालं असतं? आम्ही घोषणाबाजी करत होतो तेव्हा त्यांनी यायला नको हवं होतं. याचा अर्थ त्यांना झोंबलं. मिरची कशी झोंबते तशी त्यांना झोंबली.'

अधिक वाचा: Nitesh Rane : उत्तर प्रदेशच्या लव जिहाद कायद्याच्या धर्तीवर राज्यात कायदा करणार का? नितेश राणेंच्या प्रश्नावर गृहमंत्री फडणवीस यांनी दिले उत्तर

'आम्ही तिथे असताना तिथे यायचं तुमच्या सगळ्या लोकांचं लक्ष विचलित करायचं. मग आम्ही काय बांगड्या भरल्यात? जशास तसं उत्तर आम्ही त्यांना दिलेलं आहे. त्यांनी आमचा नाद काय आहे. आम्ही कोणाला पाय लावत नाही. चुकून पाय लागला तर आम्ही नमस्कार करु. पण आम्हाला कोणी पाय लावायचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना सोडणार नाही. जो येईल अंगावर त्याला घेऊ शिंगावर. मग कोणी का असेना..' अशा शब्दात भरत गोगावले यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी