Naxal Attack In Gadchiroli: गडचिरोलीमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक पोलिस कॉन्स्टेबल जखमी 

Naxal Attack In Gadchiroli । राज्यातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात मंगळवारी माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक पोलिस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

 Clashes between police and Naxals in Gadchiroli, one police constable injured
गडचिरोलीमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, वाचा सविस्तर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गडचिरोली जिल्ह्यात मंगळवारी माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक पोलिस कॉस्टेबल गंभीर जखमी झाला आहे.
  • पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
  • जंगलात उपस्थित असलेल्या अतिरेक्यांनी गस्ती दलावर गोळीबार केल्यानंतर कमांडोनी प्रत्युत्तर दिले.

Naxal Attack In Gadchiroli । गडचिरोली : राज्यातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात मंगळवारी माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक पोलिस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्याची राजधानी मुंबईपासून ९०० किमी अंतरावर भामरागडमधील दोदराज जंगलाजवळ गडचिरोली पोलिसांचे विशेष लढाऊ तुकडी असलेल्या सी-६० कमांडोचे पथक या भागात गस्त घालत असताना ही चकमक झाली. पथक जवळ येताच गस्तीदरम्यान घातपाती हल्ला करणाऱ्या नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर कमांडोंनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. (Clashes between police and Naxals in Gadchiroli, one police constable injured). 

अधिक वाचा : 'मेट गाला फॅशन वीक' मध्ये फक्त नताशाचीच हवा

नक्षलवाद्यांनी जंगलाकडे घेतली धाव

अधिकाऱ्यांनी आणखी सांगितले की, जंगलात उपस्थित असलेल्या अतिरेक्यांनी गस्ती दलावर गोळीबार केल्यानंतर कमांडोनी प्रत्युत्तर दिले तेव्हा नक्षलवाद्यांनी पाठलाग केला. तसेच काही वेळाने नक्षलवादी जंगलात पळून गेले. मात्र गोळीबारात एक पोलिस हवालदार गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नक्षलवाद्यांचा शोध सुरू 

या हल्ल्यानंतर भामरागडच्या जंगलात पळून गेलेल्या नक्षलवाद्यांसाठी शोधमोहीम सुरू आहे. नक्षलवादी घनदाट जंगलाच्या दिशेने पळून गेले आहेत. गडचिरोली हा एक असा भाग आहे जिथे नक्षलवादी मोठ्या प्रमाणात आढळतात. तसेच त्यांना महाराष्ट्रातून छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर प्रवेश करणे सोपे आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गडचिरोलीत सी-६० कमांडोसोबत झालेल्या भीषण चकमकीत माओवादी कमांडर मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षलवादी ठार झाले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी