Gandi Jayanti : स्वच्छ सागर... सुरक्षित सागर, दादर समुद्रकिनाऱ्याने घेतला मोकळा श्वास

 फेसाळणाऱ्या समुद्रांच्या लाटांसोबत येणारे प्लास्टिक, निर्माल्य आणि दुसरीकडे पर्यटकांकडून होणारा अस्वच्छतेचा मारा यामुळे कचरा कुंडी झालेल्या दादरच्या समुद्र किनाऱ्याने आज अखेर मोकळा श्वास घेतला.

Clean Sea Safe Sea, Dadar beach breathed a sigh of relief
दादर समुद्रकिनाऱ्याने घेतला मोकळा श्वास  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गांधी जयंतीदिनी स्वच्छता मोहिम
  • दादरच्या समुद्र किनाऱ्याने आज अखेर मोकळा श्वास घेतला.
  • वसुंधरा फाउंदडेशन, मिशन ऑनलाईन स्वराज्य आणि ब्रिदिंग रुट्स या तीन संस्थांच्या शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी ही मोहिम राबवली.

मुंबई :  फेसाळणाऱ्या समुद्रांच्या लाटांसोबत येणारे प्लास्टिक, निर्माल्य आणि दुसरीकडे पर्यटकांकडून होणारा अस्वच्छतेचा मारा यामुळे कचरा कुंडी झालेल्या दादरच्या समुद्र किनाऱ्याने आज अखेर मोकळा श्वास घेतला. निमित्त होते गांधी जयंती निमित्त राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेचे. स्वच्छ सागर... सुरक्षित सागर हा संकल्प मनाशी बांधून वसुंधरा फाउंदडेशन, मिशन ऑनलाईन स्वराज्य आणि ब्रिदिंग रुट्स या तीन संस्थांच्या शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी ही मोहिम राबवली. यावेळी अभिनेता आदित्य देशमुख, डॉ. अभिषेक साटम यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुंबईला समुद्र किनाऱ्याची नैसर्गिक देणगी लाभली आहे. पण अस्वच्छतेमुळे या  किनाऱ्याची अवस्था दयनीय झाली आहे.त्यामुळे आपले समुद्र किनारे वाचवण्यासाठी वसुंधरा फाउंडेशन, मिशन ऑनलाईन स्वराज्य आणि ब्रिदिंग रुट्स या सामाजिक संस्थांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.  त्याअंतर्गत महात्मा गांधी जयंती निमित्त दादर पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

वसुंधरा फाउंडेशन च्या सुदर्शना  जगदाळे, मिशन ऑनलाईन स्वराज्यचे केतन गावंड आणि ब्रिदींग रुट्स चे जयेश लांबोर व परेश चुरी या संस्थापकांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून श्रमदान केले.वरिष्ठ छायाचित्रकार राजेश वराडकर, अभिनेता आदित्य देशमुख, पोतदार कॉलेज मधील एनएसएस विभातील विद्यार्थी, ग्रामस्थ आणि तिन्हीं संस्थांमधील सभासदांनी एकत्र येऊन किनाऱ्याची साफसफाई केली. यावेळी बराचसा मायक्रो प्लास्टिक, कपडे, काचेच्या वस्तू असा नानाप्रकारचा कचरा गोळा करण्यात आला.

WhatsApp Image

समुद्र आणि मानवी जीवनवर मार्गदर्शन

या स्वच्छता मोहिमेत समुद्र आणि मानवी जीवन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. समुद्रशास्त्रावर पीएचडी केलेले डॉ. अभिषेक साटम यांनी हे मार्गदर्शन केले.  या उपक्रमाला मुंबई महापालिकेच्या दादर जीवनोत्त्र विभागाचेही सहकार्य लाभले असल्याची माहिती यावेळी सुदर्शना जगदाळे यांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी