Mumbai News: मुंबईतल्या दिवाळीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, पालिका आयुक्तांना दिले आदेश

गावगाडा
Pooja Vichare
Updated Sep 16, 2022 | 09:05 IST

CM Eknath Shinde decision:लवकरच दिवाळीचा सण येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी यंदाच्या दिवाळीबाबत (Diwali) मोठी घोषणा केली आहे.

Eknath Shinde
मुंबईतल्या दिवाळीबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय 
थोडं पण कामाचं
  • राज्यभरासह मुंबईत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव (Ganeshotsav) पार पडला. आता लवकरच दिवाळीचा सण येणार आहे.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी यंदाच्या दिवाळीबाबत (Diwali) मोठी घोषणा केली आहे.
  • राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

 मुंबई: CM Eknath Shinde on Maharashtra Diwali Celebration: आताच राज्यभरासह मुंबईत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव (Ganeshotsav) पार पडला. आता लवकरच दिवाळीचा सण येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी यंदाच्या दिवाळीबाबत (Diwali)  मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे कोरोनानंतर (Corona) राज्यात दिवाळी सण जोरदार साजरा होणार आहे. दहीहंडी (Dahi Handi)  आणि गणेशोत्सवावनंतर राज्यात दिवाळी धुमधडाक्यात साजरी होईल. दिवाळीमध्ये संपूर्ण मुंबईत रोषणाई केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. 

वेदांताबाबत मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया 

तसंच वेदांता कंपनीचा विषय खूप चालतोय, अडीच वर्षांमध्ये त्यांनी काही केलं नाही. 2 महिन्यांमध्ये आम्ही प्रयत्न केला पण कंपनीने आधीच जायचं ठरवलं होतं. मी कामातून उत्तर देईन. याविषयी पंतप्रधानांशी बोलणं झालं आहे. राज्यात मोठे प्रकल्प आणण्याचं आश्वासन त्यांनी दिलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

अधिक वाचा-  Pune News: विद्येच्या माहेरघरात चाललंय काय? आयोजित केलंय 'सेक्स तंत्र' नावाचं शिबीर, जाहिरात VIRAL

''मुंबईत आमूलाग्र बदल घडवायचे आहेत''

आधी माझ्याकडे अधिकार कमी होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पालिका आयुक्त चहल यांना बोलावलं. साडेपाच हजार कोटींची रस्त्यांची काम सुरू झाली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सरकारबद्दलचं चांगलं वाईट मत बनवण्याची भिस्त अधिकाऱ्यांवर असते. मुंबईत आमूलाग्र बदल घडवायचे आहेत असं म्हणत  रस्त्यांच्या क्वालिटीवर लक्ष द्या, पैसे खर्च करतो ते वाया घालवू नका. यामुळे काहींना टीका करण्याची संधी मिळते ती मिळणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

''मुंबई दोन वर्षात खड्डेमुक्त होणार''

येत्या दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त होईल. मग खड्डे दाखवा आणि बक्षीस मिळवा, असं आपल्याला करावं लागलं. ठाणे-नवी मुंबईत जसं सुशोभीकरण केलं, तसं आपणही करावं, असं एकनाथ शिंदे यांनी अभियंत्यांना सांगितलं. रस्त्याचे काम चांगल्या गुणवत्तेचे झाली पाहिजेत. तसंच, रस्त्यात खड्डे पडणार नाहीत याचीही दक्षता घेण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी