दिल्ली दरबारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेवटच्या रांगेत, NITI Aayog Meeting मधील एकनाथ शिंदे यांचा PHOTO व्हायरल

NITI Aayog Meeting Updates: आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाची बैठक पार पडली. बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तिसऱ्या रांगेत उभे केल्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.

CM Eknath Shinde in last row at NITI Aayog Meeting,
दिल्ली दरबारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेवटच्या रांगेत, NITI Aayog Meeting मधील एकनाथ शिंदे यांचा PHOTO व्हायरल  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • दिल्ली येथे पार पडलेल्या निती आयोगाची बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना तिसऱ्या रांगेत उभे केल्यावरून रोहित पवारांचा केंद्रावर हल्ला
  • राष्ट्रवादीच्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर;

NITI Aayog Meeting Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या थिंक टँक NITI Aayog च्या 7 व्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीचे अध्यक्षस्थान केले. या बैठकीत केंद्रीय मंत्री आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते. ही बैठक सकाळपासून सायंकाळपर्यंत चालली. दरम्यान मिटिंगमधील फोटो व्हायरल झाले असून यामध्ये एका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या ग्रुप फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेवटच्या रांगेत उभे राहिले आहे. त्यावरुन महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. (CM Eknath Shinde in last row at NITI Aayog Meeting,)

अधिक वाचा : गणेशोत्सवासाठी २९ ऑगस्ट रोजी दादर कणकवली मोदी एक्सप्रेस धावणार

बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विविधीकरणाचे महत्त्व आणि विशेषतः खाद्यतेलाबाबत स्वावलंबी होण्याची गरज व्यक्त केली. तसेच पंतप्रधानांनी भारताच्या कोविड नंतरच्या परिस्थितीवर तसेच पुढील धोरणावर चर्चा केली आणि सूचनाही दिल्या.कोविड-19 महामारीदरम्यान केंद्र आणि राज्यांनी एकमेकांसोबत ज्या प्रकारे निर्णय घेतले त्यावर पंतप्रधान मोदींनी लक्ष केंद्रित केले. कोविड संकटाच्या काळात भारताची संघराज्य रचना आणि सहकारी संघराज्य हे जगासमोर एक मॉडेल म्हणून उदयास आले.

अधिक वाचा : पोपट शिट्ट्या मारतोय म्हणून शिंदेंनी केली पोलिसात तक्रार, अमजद खानवर गुन्हा दाखल

या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विट करत निती आयोगाच्या मिटिंगमधील फोटो शेअर केले. त्यापैकी एका फोटोमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिसत आहेत. तो फोटो राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात!, असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.

यावर  भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही अपमान करण्याचा उद्देश नाही, आता यांना मराठी माणसांचे पडले आहे, आताप्रर्यंत कॉंग्रेस दिल्लीच्या तख्तापुढे पाणी भरायचे तेव्हा कुठे गेला होता यांचा स्वाभिमान. उद्या नीती आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्राला शिंदे आणि फडणवीस यांच्या माध्यमातून विकास निधी येईल, तेव्हा त्यांना कळेल महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं हित कसे सांभाळले जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी