मुंबई : बंडखोरांपैकी एकानेही मला समोर येऊन सांगावं, मी मुख्यमंत्रिपदी नको त्याक्षणी मी राजीनामा द्यायला तयार आहे. फक्त ज्यांना मी नकोय, त्यांनी मला सांगावं, अशी रोखठोक भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडल्यानंतर आता सेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी एकामागून एक २ ट्विट केलं आहेत. या ट्विटमधून त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबरची साथ सोडण्याची मागणी केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा फायदा झालाय, पण शिवसैनिक भरडला गेलाय, अशी खंत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. (CM's emotional appeal, but Shinde rejected the proposal, presented in 4 points.)
१. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला. — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
२. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. #HindutvaForever
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं असतं की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको तर ठीक आहे. पण मला दु:ख झालं की माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको... आता काय बोलावं....सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर सांगावं. तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्रिपदी नको, मला तोंडावर सांगा, मी आता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या भावनिक पण तितक्याच रोखठोक भाषणानंतर एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं. अखेर एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना आघाडीतून बाहेर पडा, हीच प्रमुख मागणी केली आहे.
३. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक. — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
४. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.#HindutvaForever
एकनाथ शिंदेचे २ ट्विट अन् ४ मुद्दे
१. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
२. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.
३. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
४. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.
मुख्यमंत्र्यांची भावनिक साद
बंडखोरांपैकी एकानेही मला समोर येऊन सांगावं, मी मुख्यमंत्रिपदी नको त्याक्षणी मी राजीनामा द्यायला तयार आहे. फक्त ज्यांना मी नकोय, त्यांनी मला सांगावं. मी राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवलंय. मला कोणताही मोह नाही, असा निरोपच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर प्रथमच आपली भूमिका मांडली. यावेळी भाजपसोबत जाण्याचा कोणताच विचार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी नि:क्षून सांगितलं. गेल्या ४८ तासांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखठोक भाष्य केलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडावरही त्यांनी सेना स्टाईलने आपली भूमिका मांडली.