हिंगोली : काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आमदार डॉ.प्रज्ञा सातव यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. महिला आमदार प्रज्ञा सातव यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर मागून हल्ला केला. आपल्या जीवाला धोका असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. (Congress MLA Pragya Satav attacked)
अधिक वाचा : Virat kohli : कोहली 'विराट' विक्रमाच्या उंबरठ्यावर, हव्या फक्त एवढ्या धावा
प्रज्ञा सातव म्हणाल्या, 'मी कळमनुरी तालुक्यातील काही गावांच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान धावंडा गावात कसगे गाडीतून खाली उतरत असताना माझ्या कारच्या दरवाजाजवळ एक व्यक्ती आला. यामुळे मी ताबडतोब कारच्या आत बसले आणि दरवाजा बंद केला. यानंतर माझ्या अंगरक्षकाने त्याला माझ्यापासून दूर नेले.
पुढे प्रज्ञा सातव यांनी सांगितले की, 'बॉडीगार्डने त्याला बाजूला घेतले, त्यानंतर मी खाली उतरले आणि नियोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले. तिथे मी लोकांशी बोलत असताना मागून आलेल्या या व्यक्तीने माझ्यावर हल्ला केला. मी ताबडतोब सावध झाले आणि बाकीच्या लोकांनी त्याला पकडले. याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
पुढे प्रज्ञा सातव म्हणाल्या, 'माझ्यावर हल्ला करणारी व्यक्ती माझी ओळख नव्हती. तो मला आधी ओळखत असण्याची शक्यताही कमी आहे. तरीही, गर्दीत तो माझ्यापर्यंत अचूक पोहोचला. हा हल्ला पूर्वनियोजित असावा असे वाटते. कारण काल गावातील लोकांना कळवले होते की मी तिथे जाणार आहे.
अधिक वाचा : नेरूळचे ITM-IHM कॉलेज साजरा करणार MELANGE कार्यक्रम
प्रज्ञा सातव शेवटी म्हणाल्या, 'पुन्हा अशी हिंमत कोणी करू नये, म्हणूनच मी शांत न राहता पोलिसात तक्रार दाखल केली आहे. जर आपण शांत बसलो तर समोरच्या व्यक्तीची हिंमत आणखी वाढेल. ,