Bageshwar Baba यांच वादग्रस्त वक्तव्य पण..., तुकाराम महाराजांच्या वंशजांनी दाखवला मनाचा मोठेपणा

bageshwar baba controversy : धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबाने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे.

Controversial statement of Bageshwar Baba about Sant Tukaram Maharaj
Bageshwar Baba यांच वादग्रस्त वक्तव्य पण..., तुकाराम महाराजांच्या वंशजांनी दाखवला मनाचा मोठेपणा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बागेश्वर बाबा नव्या वादाच्या भोवऱ्यात
  • संत तुकाराम महाराजांबद्दल संतापजनक विधान
  • शिवसेना, मनसे आणि भाजपची आक्रमक भूमिका

मुंबई : आपल्या चमत्कारिक दाव्यामुळे वादात सापडलेले बागेश्वर बाबा आता नव्या वादात सापडले आहेत. संत तुकाराम महाराजांना त्यांच्या पत्नीकडून रोज मारहाण होत असे, असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेना (ठाकरे गट), मनसे, भाजपच्या अध्यात्मिक आघाडीसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसनेही बागेश्वरबाबांच्या वक्तव्याला विरोध केला आहे.  दरम्यान, देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत बागेश्वर बाबांना माफ केले. (Controversial statement of Bageshwar Baba about Sant Tukaram Maharaj)

 

अधिक वाचा : Beed Crime News : बायको हरविल्याची तक्रार करायला गेला आणि वेगळ्याच गुन्हात पडल्या बेड्या 

काय म्हणाले बागेश्वर बाबा?

बागेश्वर बाबाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते म्हणत आहेत की, "संत तुकाराम महाराष्ट्रातील एक संत होते. त्यांची पत्नी त्यांना दररोज काठीने मारहाण करत होती. एका व्यक्तीने त्यांनी याबद्दल विचारलं की, 'तुम्ही दररोज बायकोचा मार खाता, तुम्हाला त्याची लाज वाटत नाही का?' त्यावर तुकाराम महाराज त्या व्यक्तीला म्हणाले की, 'मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे."

भाजपच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बागेश्वर बाबांचा निषेध नोंदवला आहे. तसेच भाजपच्यावतीने तुषार भोसले यांनीही  निशाणा साधला. ते म्हणाले,  केवळ वारकरी समाजाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. त्यामुळे बागेश्वरबाबांनी तुकारामांची माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे आचार्य यांनी केली.

अधिक वाचा : Mumbai Viral Video:डोंबिवली रेल्वे स्थानकावर कपलचा खुल्लम खुल्ला प्यार; जोडप्याचा Kissing व्हिडिओ व्हायरल 

राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनीही बागेश्वर बाबांच्या वक्तव्याचा निषेध केला. बागेश्वर बाबांनी तुकारामांवर आक्षेपार्ह विधान केले असेल तर ते दाखवणे बंद करा. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संत तुकाराम महाराजांबद्दल कोणी काही बोलले असेल तर त्याचा जाहीर निषेध केला पाहिजे.

अधिक वाचा : अदानी समूहाने हिंडेनबर्गचे आरोपांना म्हटले 'खोटे', सर्व आरोप फेटाळले

दरम्यान, देहू संस्थानच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे की, बागेश्वर महाराज आम्ही तुम्हाला माफ करतो. क्षमा करणे हा वारकऱ्यांचा सर्वात मोठा गुण आहे. संतांवर चुकीचे वक्तव्ये करू नयेत. महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांना आवाहन करतो की यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. संतांवर कोणी काही बोलू नये म्हणून यावर कायदा बनवावा. जेणेकरून अशा गोष्टींना पायबंद बसेल. अशी प्रतिक्रिया देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी